Pune Bjp forgets to invite MLA vijay Kale | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

आमदार विजय काळेंना निमंत्रणाचा पुणे भाजपला विसर!

उमेश शेळके
सोमवार, 14 मे 2018

पुणे : लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागल्याने भाजपमधील गटबाजी पुन्हा उफाळून येण्यास सुरवात झाली आहे. एका वाहनतळाच्या नामसभारंभाच्या कार्यक्रमावरून हे दिसून आले आहे. वाहनतळ उभारणीत मोठा वाटा असलेल्या एका माजी नगरसेवक आणि विद्यमान आमदाराला साधे निमंत्रण देण्याचे देखील औचित्य पक्षातील एका गटाकडून दाखविण्यात आले नाही. 

पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होत आहे. या पार्श्‍वभूमीवर नगरसेवकांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करून तेथे उपस्थिती लावणे, असा एक कलमी कार्यक्रम इच्छुकांकडून सध्या सुरू झाला आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून विविध घटकांपर्यंत पोचणे हा एकमेव उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. याच हेतूने काल एक कार्यक्रम पुण्यात झाला.

लक्ष्मी रस्त्यावर खरेदीसाठी येणाऱ्या वाहनांची पार्किंगची सोय उपलब्ध व्हावी, यासाठी दहा वर्षांहून अधिक काळापूर्वी महापालिकेकडून वाहनतळ उभारण्यात आले आहे. या वाहनतळाचे नामकरण करण्याचे कार्यक्रमाचे काल आयोजन पक्षाच्या नगरसेवकाकडून करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे आणि शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासह विरोधी पक्षातील दोन माजी महापौरांना देखील आमंत्रित करण्यात आले होते.

मात्र या वाहनतळाच्या उभारणीत मोठा वाटा असलेले माजी नगरसेवक आणि विद्यमान आमदार विजय काळे यांना मात्र या कार्यक्रमाचे आमंत्रण देखील देण्यात आले नाही. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हा चर्चेचा विषय झाला होता. या कार्यक्रमासाठी सर्व मराठा समाजातील मान्यवरांना आमंत्रण देण्यात आले होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठा समाजातील मान्यवरांच्या गाठीभेटी घेण्याचे औचित्य इच्छुकांनी साधून घेतले.
 
संबंधित लेख