Pune BJP Corporator Slapped Doctor at Sasoon Hospital | Sarkarnama

भाजप नगरसेविकेने मारली डॉक्टरला चापट; ससून हाॅस्पीटल मधील घटना

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 13 मार्च 2019

भाजपच्या नगरसेविका आरती कोंढरे यांनी ससून रूग्णालयात महिला डाॅक्टरला चापट मारल्याची घटना मध्यरात्री घडली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डाॅ. स्नेहल अशोक खंडागळे  यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

पुणे :  भाजपच्या नगरसेविका आरती कोंढरे यांनी ससून रूग्णालयात महिला डाॅक्टरला चापट मारल्याची घटना मध्यरात्री घडली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डाॅ. स्नेहल अशोक खंडागळे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास डाॅ. खंडागळे या आपातकालीन कक्षात असताना नगरसेविका कोंढरे तेथे आल्या. मोठ्याने आरडाओरडा करत या रुग्णाला कोण पहात आहे असे विचारले. त्यावेळी खंडागळे यांनी या रुग्णाच्या डोक्यात मोठी जखम आहे,  त्यांना सिटी स्कॅन साठी घेऊन जाणार आहोत असे सांगून दुसर्या रुग्णास तपासण्यासाठी जात होत्या. त्यावेळी कोंढरे यांनी तुझी तक्रार डाॅ. तांबे यांच्याकडे करते असे म्हणून मोबाइलमध्ये व्हिडिओ शुटींग सुरू केले.

डाॅ. खंडागळे यांनी मोबाईलला हात आडवा लावून शुटींग करू असे सांगितले, त्यावेळी कोंढरे यांनी शिवीगाळ करून खंडागळे यांच्या गालावर जोरात चापट मारून तेथून निघून गेल्या. याविरोधात खंडागळे यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.  पुढील तपास पोलिस करत आहेत.

संबंधित लेख