pune-bharat-patankar-interview-on-jihe-kathapur | Sarkarnama

`जिहे कठापूर' ही फसवणूक; त्याच्या श्रेयाची स्पर्धा हे गमतीदार चित्र : डॉ. पाटणकर

संपत मोरे
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

"जिहे कठापूर योजना भ्रामक योजना आहे. ही योजना चारमाही चालणारी योजना आहे. या योजनेतून शेतीचा पाणीप्रश्न सुटणार नाही, पिण्याच्या पाण्याच्या योजनाना थोडा लाभ होईल," असे श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी `सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

पुणे : "जिहे कठापूर योजना भ्रामक योजना आहे. ही योजना चारमाही चालणारी योजना आहे. या योजनेतून शेतीचा पाणीप्रश्न सुटणार नाही, पिण्याच्या पाण्याच्या योजनाना थोडा लाभ होईल," असे श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी `सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

जिहे कठापूर योजनेचा केंद्रीय जल आयोगात समाविष्ट केल्यानंतर साताऱ्यात भाजप शिवसेनेत श्रेयवाद घेण्याची स्पर्धा सुरू झाल्याच्या पाश्वभूमीवर पाटणकर यांनी "मुळात या योजनेतून शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, शेती बागायती होईल असं सांगणं म्हणजे दुष्काळी जनतेची फसवणूक आहे. ही फसवणूक केल्याचेही श्रेय घेण्याची स्पर्धा सुरू असेल तर गमतीदार चित्र आहे" अशी प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, "जिहे कठापूर योजना आठमाही, सहामाही नाही. ती चारमाही आणि फक्त पावसाळ्यात चालणारी आहे. या चारमाही चालणाऱ्या योजनेतून शेतीच्या पाण्याचा प्रश्न कसा सुटेल?या योजनेतून पिण्याच्या पाण्याच्या ज्या योजना आहेत त्या थोड्याफार कार्यान्वित होतील.पण शेतीसाठी या योजनेचा उपयोग होऊ शकत नाही. वरच्या बाजूला असलेली धरण धोम, धोम बलकवडी, कणेर, वेनालेक ही धरणे  भरल्यावर उलटून जे पाणी खाली येईल त्याच पाण्यावर ही योजना चालेल.आणि अशी परिस्थिती फक्त पावसाळ्यात असते. पावसाळ्याच्या चार महिन्यानंतर ही योजना कशी चालेल?"
 

संबंधित लेख