समाजवादी विचारांना शक्ती देण्याचे काम "भाई'नीं केले : शरद पवार 

देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्या आणि स्वातंत्र्यानंतर सामान्य माणसाच्या हिताची भूमिका घेणाऱ्या जयप्रकाश नारायण, मधु लिमये, एस. एम. जोशी या विचारवंतांसोबत भाई वैद्य यांनी आपल्या आयुष्याचा मोठा कालावधी घालविला. समाजवादी विचाराला शक्‍ती देण्याचे कार्य त्यांनी केले, या शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाई वैद्य यांना श्रद्धांजली वाहिली.
समाजवादी विचारांना शक्ती देण्याचे काम "भाई'नीं केले : शरद पवार 

पुणे : देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्या आणि स्वातंत्र्यानंतर सामान्य माणसाच्या हिताची भूमिका घेणाऱ्या जयप्रकाश नारायण, मधु लिमये, एस. एम. जोशी या विचारवंतांसोबत भाई वैद्य यांनी आपल्या आयुष्याचा मोठा कालावधी घालविला. समाजवादी विचाराला शक्‍ती देण्याचे कार्य त्यांनी केले, या शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाई वैद्य यांना श्रद्धांजली वाहिली. 

भाई आज आपल्यात नाहीत, हे सहन करणे कठीण आहे. भाई यांच्या विचारांच्या हिताची जपणूक करण्याचा प्रयत्न करणे, हीच त्यांना खरी श्रद्धाजंली ठरेल, असे मत पवार यांनी व्यक्त केले. 

डॉ. रावसाहेब कसबे (ज्येष्ठ विचारवंत) : राजकीय नेत्यांमध्ये घुसमटल्यासारखे वाटायचे. पण दादासाहेब रुपवते आणि भाई वैद्य या दोन नेत्यांसमवेतचा सहवास नेहमी हवाहवासा वाटायचा. त्यांनी आयुष्य समाजवादाला वाहून दिले होते. स्वातंत्र्य चळवळीपासून नामांतर लढा, मंडल आयोग अशा विविध मुद्यांवर दिलेला लढा म्हणजे संग्राम होता. ते नेहमी राष्ट्र सेवा दल आणि अन्य संस्थांच्या माध्यमातून त्यांनी समाजवाद जोपासला. त्यांच्या जाण्याने चळवळीचे खूप मोठी हानी झाली आहे. 

गिरीश बापट (पालकमंत्री, पुणे) : ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी लोकशाही मूल्ये जतन करण्याचे व्रत अंगिकारले होते. गोरगरिबांच्या हक्कांसाठी सतत रस्त्यावर येऊन लढा उभा करणारे भाई पुणेकरांचे श्रद्धास्थान होते. स्वतंत्र सैनिक, गोवा मुक्ती आंदोलनातील नेता शिक्षण हक्कासाठी सत्याग्रह करणारे भाई आपल्यातून नाहीसा झाला आहे. 

डॉ. हमीद दाभोलकर (महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती) : टोकाची सामाजिक विषमता वाढणे, धर्मनिरपेक्षता धोक्‍यात येणे या कालाखंडता भाईंचे नसणे हे हुरहूर लावणारे आहे. आजच्या काळात भाईंसारख्या नेत्याचे मार्गदर्शन आमच्यासाठी खूप मोलाचे होते. त्यांच्यासारखा नेता पुन्हा होणे, हीच त्यांना खरी श्रद्धाजंली ठरेल.'' 

रझिया पटेल ( सामाजिक कार्यकर्त्या) : समाजवादी चळवळीतील कार्यकर्त्यांना भाईंमुळे ऊर्जा मिळायची. लोकशाही समाजवाद म्हणजे काय हे भाईंचे विचार ऐकले की कळायचे. आजच्या तरुणांनाही त्यांचे आकर्षण वाटायचे. समाजातील विषमतेच्या विरोधात भाई नेहमी लढा उभा करायचे. वंचित घटकातील नागरिकांच्या हक्काबद्दल संवेदनशील असे त्यांचे व्यक्तीमत्व होते. 

मुक्ता मनोहर (सामाजिक कार्यकर्त्या) : भाई वैद्य यांना अनेकवेळा भेटण्याचा योग आला. त्यांच्याशी मनमोकळा मैत्रिपूर्ण संवाद अगदी सहज साधता यायचा. आम्ही केलेल्या आंदोलनांना त्यांनी नेहमीच पाठिंबा दिला. त्यांच्या सहवासाने आणि अनुभवांच्या शिदोरीने पुढे जाण्याची ताकद मिळायची. ते कायम सामाजिक बदलांसाठी झटले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com