pune bar association will fight for maratha youth | Sarkarnama

मराठा आंदोलकांसाठी पुण्यातील वकील फुकट लढणार

उमेश घोंगडे
गुरुवार, 26 जुलै 2018

पुणे : आरक्षण आंदोलनादरम्यान ज्या मराठा युवकांवर गुन्हे दाखल झाले आहेत अशा आंदोलकांचे खटले पुणे बार असोसिएशनच्यावतीने मोफत लढविण्यात येतील, असे पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुभाष पवार यांनी जाहीर केले.
 
पुणे बार असोसिएशनची बैठक आज झाली. या बैठकीत आंदोलनाची चर्चा झाली व या संदर्भातील खटले कोणत्याही शुल्काशिवाय लढण्याचा निर्णय घेण्यात आला. आजपर्यंत गुन्हे दाखल झालेल्या अशा पाच तरूणांनी संपर्क साधला असून त्यांचे वकीलपत्र घेण्यात येत आसल्याचे ऍड. पवार यांनी सांगितले.

मराठा समाजाची आरक्षणाची मागणी योग्य आहे. त्यांच्या मागणीचा राज्य सरकारने सहानुभूतीने विचार करावा, अशी मागणी करीत या संदर्भात बार असोसिएशनच्यावतीने पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून या मागणीचे निवेदन देण्यात येणार असल्याचे ऍड. पवार यांनी सांगितले. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात पुणे परिसरात झालेल्या आंदोलनाचे गुन्हे काही कार्यकर्त्यांवर झाले आहेत. या सर्व तरूणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. येत्या काही दिवसात त्यांच्यावर अटकेची कारवाई पोलिसांकडून होण्याची शक्‍यता आहे. अशा साऱ्या युवक कार्यकर्त्यांच्या मदतीला पुणे बार असोसिएशन धावून जाणार आहे. 

दरम्यान, जिल्ह्यातही काही ठिकाणी युवकांवर आंदोलनाचे गुन्हे दाखल झाले आहेत. तालुक्‍याच्या ठिकाणी त्या-त्या पातळीवर या युवकांना कायदेशीर मदत मिळण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. स्थानिक बार असोसिएशनकडून त्यासाठी पुढाकार घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख