अनिल शिरोळे पुण्याचे महापौर किंवा "स्थायी'चे अध्यक्ष झाले असते, तर ते खासदार नसते!

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे तेव्हाचे 'सबसे बडा खिलाडी' सुरेश कलमाडींना पक्षाने तिकिट नाकारले. परिणामी, पुणे महापालिकेत राजकीय उलापालथ झाली, तेव्हाच कलमाडींनी नव्या राजकीय समीकरणातून भाजपचे नगरसेवक अनिल शिरोळेंना स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली आणि आपलाही उमेदवार रिंगणात उतरविला. या खेळीत शिरोळे पहिल्याच फेरीत बाहेर पडले. पण, तेव्हा स्थायीच्या अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली असती तर शिरोळे आज पुण्याचे खासदार नसते.....
अनिल शिरोळे पुण्याचे महापौर किंवा "स्थायी'चे अध्यक्ष झाले असते, तर ते खासदार नसते!

पुणे : लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे तेव्हाचे 'सबसे बडा खिलाडी' सुरेश कलमाडींना पक्षाने तिकिट नाकारले. परिणामी, पुणे महापालिकेत राजकीय उलापालथ झाली, तेव्हाच कलमाडींनी नव्या राजकीय समीकरणातून भाजपचे नगरसेवक अनिल शिरोळेंना स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली आणि आपलाही उमेदवार रिंगणात उतरविला. या खेळीत शिरोळे पहिल्याच फेरीत बाहेर पडले. पण, तेव्हा स्थायीच्या अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली असती तर शिरोळे आज पुण्याचे खासदार नसते..... 

पुण्याच्या राजकारणातील अशा घडामोडी सोमवारी ताज्या झाल्या. त्याला निमित्त ठरले ते शहराच्या राजकारणाचा गेली सहा दशके केंद्रबिंदू असलेल्या महापालिकेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाच्या निरोपाचे.
 
महापालिकेच्या आवारात विस्तारीत इमारत उभारण्यात आली असून, तिच्या तिसऱ्या मजल्यावर अत्यंत देखणे सभागृह उभारले आहे. या सभागृहातील प्रवेशाचा मुहुर्त उद्या (ता.18) आहे. या सभागृहात उद्या पहिलीवहिली सर्वसाधारण सभा होणार असून, त्याआधी या सभागृहाचा छोटेखानी निरोप समारंभ पार पडला. तेव्हा, सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या काळातील कामगिरी मांडत, गेल्या 20 ते 25 वर्षांतील सभागृहाचे महत्त्व पटवून दिले. 

एरवी, एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण करणाऱ्यांनी या कार्यक्रमात मात्र, एकमेकांचे तोंड भरून कौतुक करीत होते. सन 1997 पासूनच्या सभागृहातील आठवणी मांडल्या. त्यात, अभ्यासू गटनेत्यांची भाषणे, कुरघोड्या, पक्षातर्गंत खेळी आणि त्यांचे राजकीय परिणामही सांगण्यात आले. तेव्हा, कलमाडींच्या राजकीय चलाखीचा फटका शिरोळेंना कसा बसला आणि त्यांना स्थायीच्या अध्यक्षपदाने कशी हुलकावणी दिली, हे कॉंग्रेसचे गटनेते आणि या निवडणुकीत या पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार अरविंद शिंदे यांनी सांगितले. 

लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी कॉंग्रेसचा हात सोडलेल्या कलमाडींनी भाजप आणि शिवसेनेशी संधान बांधले. त्यातून पुणे विकास आघाडीचे गणित जुळले. त्यात महापौर, उपहामहापौर आणि स्थायीचे अध्यपदाच्या वाटाघाटी झाल्या. त्यातून 1999 -2000च्या निवडणुकीत भाजपकडे अध्यक्षपद देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार शिरोळेंना उमेदवारी दिली. पण राजकीय चलाखी दाखवत कलमाडींनी आघाडीतर्फे (कै.) अरुण धिमधिमे यांना उमेदवारी दिली. कॉंग्रेसने शिंदेंना उतरविले होते. 

पहिल्या फेरीत शिरोळे बाहेर पडले, त्यावरून संतप्त झालेल्या भाजप-शिवसेनेच्या सदस्यांनी दुसऱ्या फेरीच्या मतदनावर बहिष्कार टाकून, त्यांनी सभात्याग केला. तेवढ्यात कलमाडींनी भाजप नेते (कै.) गोपीनाथ मुंडेशी चर्चा करून भाजपला बष्हिकार मागे घ्यायला भाग पाडले. शिरोळेंना महापौर करण्याचा शब्द कलमाडींना दिला. या आशेने भाजप-शिवसेनेच्या सदस्यांनी आघाडीच्या धिमधिमेंना मते दिली. शिंदेंचा पराभव झाला. पण, कलमाडींना शब्द काही पाळला नाही आणि शिरोळे काही महपौरांच्या आसनावर बसले नाहीत. त्यामुळेच ते आज खासदर होऊ शकले. 

शिरोळे स्थायीचे अध्यक्ष किंवा महापौर झाले असते तर भाजपच्या अंतर्गंत राजकारणात अडकले असते आणि ते आज खासदार झाले नसते, हेच तर शिंदेंना सुचवायचे नसेल ना, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com