puja more criticizes bjp | Sarkarnama

मराठ्यांना आरक्षण मिळालं म्हणून जल्लोष करणारे भाजपचे कार्यकर्ते : पूजा मोरे

संपत मोरे
रविवार, 2 डिसेंबर 2018

पुणे : मराठ्यांना आरक्षण मिळालं म्हणून हे जल्लोष करणारे भाजपचे कार्यकर्ते आहेत. सरकारने दिलेले आरक्षण म्हणजे लबाडाघरच जेवण आहे ते जेवल्याशिवाय खर कस मानायचं, असा प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांनी व्यक्त केला.

पूजा मोरे या शिवसेनेच्या चिन्हावर तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. मराठा आरक्षण प्रश्नावर त्यानी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

"सर्वसामान्यांच्या मनात हे आरक्षण न्यायालयात टिकेल की नाही, याबाबत संभ्रम असल्याची भावना आहे.म राठा क्रांती मोर्चाचे समनव्यक  कुठेही जल्लोष करताना दिसले नाहीत. जे आरक्षणाच्या लढ्यात सहभागी होते ते जल्लोष का करत नाहीत, असा प्रश्न विचारून त्या म्हणाल्या," आरक्षणानंतर  जल्लोष करणारे हे फक्त सत्ताधारी भाजपचे कार्यकर्ते आहेत. न्यायालयात आरक्षण टिकते की नाही हे बघण्या आधीच जल्लोष करणे म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्यासारखे आहे.

संबंधित लेख