puja in college at pune | Sarkarnama

सत्यनारायण पुजेला "एनएसयूआय'चा विरोध नाही...

उमेश घोंगडे
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

पुणे : पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात करण्यात आलेल्या सत्यनारायण पूजेचा प्रकाराला नॅशनल स्टुडन्टस युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) कोणत्याही प्रकारे विरोध करणार नाही, असे या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख यांनी स्पष्ट केले आहे. "एनएसयूआय' ही कॉंग्रेस पक्षाची विद्यार्थी संघटना आहे. कॉंग्रेस पक्षाची जी विचारधारा आहे तीच "एनएसयूआय'ची विचारधारा. आम्ही सर्व धर्मांचा सम्मान करतो कारण सर्वांना आपल्या धर्माचा पालन करण्याचा हक्क लोकशाहीने आपल्याला दिला आहे. आमच्या माहितीप्रमाणे फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायणाच्या पूजा तेथील प्राध्यापकांनी केली आहे.

पुणे : पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात करण्यात आलेल्या सत्यनारायण पूजेचा प्रकाराला नॅशनल स्टुडन्टस युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) कोणत्याही प्रकारे विरोध करणार नाही, असे या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख यांनी स्पष्ट केले आहे. "एनएसयूआय' ही कॉंग्रेस पक्षाची विद्यार्थी संघटना आहे. कॉंग्रेस पक्षाची जी विचारधारा आहे तीच "एनएसयूआय'ची विचारधारा. आम्ही सर्व धर्मांचा सम्मान करतो कारण सर्वांना आपल्या धर्माचा पालन करण्याचा हक्क लोकशाहीने आपल्याला दिला आहे. आमच्या माहितीप्रमाणे फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायणाच्या पूजा तेथील प्राध्यापकांनी केली आहे. काही संघटनानी याचा विरोध केला परंतु आम्ही या विषयावर कुठल्याही प्रकारचा विरोध करणार नाही. शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक रंग देऊ नये असा जरी शासनाचा अध्यादेश असला तरी त्यामाध्यमातून विद्यार्थ्यांचा कुठल्याही प्रकारचा शैक्षणिक, धार्मिक व शारीरिक नुकसान होऊ नये हा मूळ उद्देश आपण लक्षात घायला हवा, असे शेख यांनी म्हटले आहे. मी स्वत: पुण्यात दस्तूर शाळेमध्ये असताना रमजान महिन्या मध्ये नमाज पढायचो म्हणून आमच्या शाळेला धार्मिक रंग देता येणार नाही, असे शेख यांनी म्हटले आहे. 

शेख यांनी घेतलेल्या योग्य आणि समंजस भूमिकेमुळे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी यांनी मांडलेल्या भूमिकेला एक प्रकारे पुष्टी मिळाली आहे. सत्यनारायणाची पूजा घालण्यात महाविद्यालय किंवा संस्थेच्या प्रशासनाचा कोणताही संबंध नाही. महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी गेल्या 40 वर्षापासून ही पूजा करीत आहेतल असे डॉ. परदेशी यांनी स्पष्ट केले आहे. 

संबंधित लेख