psi dabade acb trap in dahivadi | Sarkarnama

ट्रॅप करायला आलेल्या ACB पथकावर गाडी घालून PSI दबडे पळाला! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

सातारा : बिअरबारचा परवाना रद्द करण्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात न पाठविण्यासाठी 13 हजारांची लाच मागणारा दहिवडी पोलीस स्टेशनचा उप निरीक्षक सतीश राजाराम दबडे (वय 55) याने 13 हजार रुपये रक्कम स्विकारली. पण लाचलूचपतचा ट्रॅप असल्याचा संशय आल्याने दबडेने वाहनासह पळून जाताना त्याची कार अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एसीबीच्या पथकावर गाडी घातली. यामध्ये एसीबीचे दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. 

याबाबत लाचलुचपत विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदाराची दहिवडीत बिअरबार व परमिट रुम आहे. या परमिट रुमबाबत तक्रारी असल्याने त्याचा परवाना रद्द करण्यासाठी सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात रिपोर्ट न पाठविण्यासाठी संबंधित पोलीस उप निरीक्षकाने तक्रारदारास 13 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार संबंधित तक्रारदाराने सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

त्यानुसार सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डिवायएसपी अशोक शिर्के यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे आणि त्यांच्या पथकाने दहिवडी येथे सापळा रचला होता. ठरल्यानुसार पोलीस उप निरीक्षक सतीश दबडे हा लाचेची रक्कम घेण्यासाठी आला. 13 हजार रुपये ही लाचेची रक्कम स्विकारल्यानंतर सतीश दबडे यास लाचलुचपत विभागाने ट्रॅप लावल्याचा संशय आल्याने तो घटनास्थळावरुन लाचेच्या रक्कमेसह चारचाकी वाहनातून पळून जाऊ लागला. मात्र एसीबीच्या पोलिसांनी त्याची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. पण दबडे थांबला नाही त्याने एसीबीच्या दोन कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घातली. त्यामुळे एसीबीचे दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. दबडे याच्यावर या संदर्भात गुन्हा दाखल झाला असून त्याचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली आहे. 

संबंधित लेख