अश्‍विनी गोरे-बिंद्रे यांचा मृतदेह शोधण्यासाठी दोन खासगी कंपन्यांना पाचारण 

बेपत्ता पोलिस अधिकारी अश्‍विनी गोरे-बिंद्रे प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी दोन खासगी कंपन्यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या कंपन्यांच्या पाणबुड्यांनी वसई खाडीत पुन्हा पाण्याखाली बुधवारी दुपारपासून शोधमोहीम राबवली.
Ashvini Gore Bindre missing case
Ashvini Gore Bindre missing case

नवी मुंबई : बेपत्ता पोलिस अधिकारी अश्‍विनी गोरे-बिंद्रे प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी दोन खासगी कंपन्यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या कंपन्यांच्या पाणबुड्यांनी वसई खाडीत पुन्हा पाण्याखाली बुधवारी दुपारपासून शोधमोहीम राबवली. ही शोधमोहीम आणखीन दोन दिवस सुरू राहणार आहे.

आरोपी पोलिस अधीक्षक अभय कुरुंदकर याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने अश्‍विनी गोरे हिची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह टाकून दिलेल्या वसई खाडीत पुन्हा एकदा शोधमोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेत पोलिसांनी दुन्निमा इंजिनियर्स व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओसिओनग्राफी या कंपन्यांची मदत घेतल्याचे समजते.

या कंपन्यांकडील अद्ययावत साहित्य व उपकरणांच्या मदतीने अश्‍विनीच्या मृतदेहाचा पाण्याखाली शोध घेतला जाणार आहे. यात पाण्याचा बदललेला रंग, पाण्याखालील दगड-माती, वाऱ्याची दिशा, पाण्याचे स्कॅनिंग अशा प्रकारे मृतदेहाचा शोध घेतला जाणार आहे. बुधवारी दुपारपासून या शोधमोहिमेला सुरुवात झाली आहे. याआधी पोलिसांनी पाणबुड्यांच्या मदतीने मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांच्या पाणबुड्यांना काही सापडले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com