ps election | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

सर्व सभापती राष्ट्रवादीचे! 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 15 मार्च 2017

सातारा पंचायत समितीचे सभापती मिलिंद कदम हे पूर्वी पिग्मी एजंट होते. त्यानंतर ते खेड ग्रामपंचायतीवर अपक्ष म्हणून निवडून आले. त्याच कालावधीत ते
उपसरपंच त्यानंतर सरपंच झाले. या वेळेस गोडोली गटातंर्गत खेड गण ओबीसी राखीव झाल्याने त्यातून ते राष्ट्रवादीतून निवडणूक लढले आणि विजयी झाले. 

सातारा : पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपला वरचष्मा ठेवण्यात यश मिळविले आहे. कऱ्हाडमध्ये उंडाळकरांसोबत भाजप
मिळून सत्ता मिळवतील, अशी परिस्थिती होती. पण माजी आमदार विलासराव पाटील उंडाळकरांसोबत आमदार बाळासाहेब पाटील यांनी यशस्वी बोलणी करत
राष्ट्रवादीचा सभापती करण्यात यश मिळविले आहे. 

पंचायत समितीनिहाय सभापती व उपसभापती असे : 
सातारा : मिलिंद कदम, जितेंद्र सावंत 
जावली : अरुणा शिर्के, दत्ता गावडे 
कोरेगाव : राजाभाऊ जगदाळे, संजय साळुंखे 
वाई : रंजना भोसले, अनिल जगताप 
महाबळेश्‍वर : रूपाली राजपुरे, संजय गायकवाड 
खंडाळा : मकरंद मोटे, वंदना धायगुडे (वंदना धायगुडे) 
फलटण : रेश्‍मा भोसले, शिवरूपराजे खर्डेकर 
माण : रमेश पाटोळे, नितीन राजगे 
खटाव : संदीप मांडवे, कैलास घाडगे 
कऱ्हाड : शालन माळी, रमेश देशमुख (कविआ) 
पाटण : उज्वला जाधव, राजाभाऊ शेलार 
 

 

संबंधित लेख