आजचा वाढदिवस : पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री.

आजचा वाढदिवस : पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री.

पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म इंदूरमध्ये मराठी कुटुंबात झाला. त्यांचे मूळ गाव कुंभारगाव (ता. पाटण) हे आहे. त्यांचे आईवडीलही राजकारणात होते. त्यांचे वडील आनंदराव चव्हाण आणि आई प्रेमलाताई चव्हाण हे दोघेही कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते. त्यामुळे राजकारणाचे बाळकडू पृथ्वीराज चव्हाण यांना लहानपणापासूनच मिळाले. बिट्‌स पिलानी येथून त्यांनी बी.ई. ही पदवी मिळवली आणि त्यानंतर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून त्यांनी एम.एस. ही पदवी मिळवली. अमेरिकेत काही काळ काम केल्यानंतर ते भारतात परतले. त्यानंतर एरोनॉटिकल क्षेत्रात त्यांनी काही काळ नोकरीही केली. राजीव गांधींच्या आग्रहाखातर त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. 

पंतप्रधान कार्यालयाचा कार्यभार समर्थपणे सांभाळला. केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री या नात्याने त्यांनी अनेक पदांचा कार्यभार पाहिला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान, संसदीय व्यवहार आणि पंतप्रधान कार्यालय ही त्यापैकी प्रमुख खाती होती. काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय करारांमध्ये त्यांनी या काळात महत्त्वाची भूमिका बजावली. विविध शिष्टमंडळाचे सदस्य असलेल्या चव्हाण यांनी अमेरिका, फ्रान्स, जपान, जर्मनी, चीन, इटली, नेदरलॅंण्ड, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड यासह अनेक देशांचे दौरे केलेले आहेत. 2010 मध्ये कॉंग्रेस पक्षाने त्यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी नियुक्ती केली. सध्या ते कराड दक्षिणचे कॉंग्रेस पक्षाचे आमदार आहेत. 

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची इलेक्‍ट्रॉनिकी, अणुऊर्जा सल्लागार समिती, वित्त आणि नियोजन, ग्रामीण आणि नागरी विकास स्थायी समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, दुय्यम विधि-विधान विशेष आमंत्रित कामकाज सल्लागार समिती. 11 व्या लोकसभेचे उपमुख्य प्रतोद, लोकसभा कॉंग्रेस संसदीय पक्षाचे सदस्य, वित्त मंत्रालयाची सल्लागार समिती. कॉंग्रेस संसदीय पक्षाचे सचिव, सार्वजनिक लेखा समिती, प्रवक्‍ता, अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस अशा अनेक पदावर त्यांनी काम केले आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com