pruthviraj chavan ex cm | Sarkarnama

मराठा समाजाच्या अस्वस्थतेचा अंत पाहू नका : पृथ्वीराज चव्हाण

आदित्य वाघमारे
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद : वरकरणी राज्यकर्ता दिसणारा मराठा समाज आज संकटात सापडलेला आहे. वेळेबरोबरच मराठा समाजातील अस्वस्थता वाढते आहे. समाजाच्या अस्वस्थतेचा बांध फुटण्यापूर्वी सरकारने या समाजाचे प्रश्न मार्गी लावावेत असा सल्ला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी औरंगाबादेत दिला. 

मराठा समाजातील महिलांच्या वतीने औद्योगिक वृद्धीसाठी आयोजित "महाएक्‍सपो'च्या उदघाटन प्रसंगी अध्यक्षीय समारोप त्यांनी केला. या एक्‍स्पोचे उदघाटन भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते झाले. दानवेंच्या उपस्थितीत त्यांनी सरकारी धोरणांचा समाचार घेतला. ते म्हणाले, "आज राज्यकर्ता आणि समृद्ध दिसणारा मराठा समाज गरिबी आणि नैसर्गिक आपत्तीनी वेढला गेला आहे. आपल्या या अडचणींना वाचा फोडण्यासाठी या समाजाने औरंगाबादेतूनच न भूतो न भविष्यती अशा क्रांती मोर्चाला आरंभ केला. कायदेशीर बाबींची तपासणी करून आम्ही आरक्षणाचा कायदा केला आणि त्याचे लाभ मिळत असतानाच नवे सरकार आले. विद्यमान सरकार प्रामाणिक प्रयत्न करत असले तरी मराठा समाजातील अस्थिरता वाढत चालली आहे.' 

रावसाहेब दानवे सारख्या नेत्याने आपली सर्व शक्ती पणाला लावून मराठा समाजाच्या समस्या तात्काळ सोडवण्याची मागणीही त्यांनी केली. आज ऑटोमॅशन आणि रोबोटिक्‍ससारखे तंत्रज्ञान लोकांच्या नोकऱ्या हिसकावून घेत आहे त्यामुळे नोकरीच्याच मागे न जाता समाजाने व्यवसाय आणि उद्योगाकडे वळावे असे आवाहन त्यांनी केले. दुसरीकडे उदघाटक रावसाहेब दानवे यांनी राजकीय भाष्य न करता मराठा समाजाच्या महिलांना उद्योगात उभारी देण्यासाठी सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन दिले. 
 
संबंधित लेख