pruthviraj chavan and udyasingh at karad | Sarkarnama

पृथ्वीराज चव्हाण आणि उदयसिंह पाटील समोरासमोर आले पण दोघांनी एकमेकांकडे पाहणे टाळले

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 17 सप्टेंबर 2018

कऱ्हाड : माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण व उंडाळकर गटाच्या मनोमिलन होणार अश्या वावड्या उठत आहेत.  यातूनच होणाऱ्या चर्चेला कराड तालुक्यात अनेक दिवसांपासून वेग आला आहे.

अशातच जेष्ठ नेते पी. डी. पाटील यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त कराडातील त्यांच्या सामधीस्थळी अभिवादन करण्यासाठी आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील एकाच वेळी या ठिकाणी आले. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. आता हे दोघे काय बोलणार असे वाटत असतानाच दोघांनीही एकमेकांकडे पाहण्याचे ही टाळले. त्यामुळे उपस्थितांची शिगेला पोचलेली उत्सुकता मात्र मावळली.

कराडचे जेष्ठ नेते पी. डी. पाटील यांच्या दहाव्या स्मृतीदिनानिमित्त येथील समाधीस्थळी अभिवादनाचा कार्यक्रम आज होता. त्यांच्या समाधीस्थळी आज सकाळपासून विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरीकांनी 
अभिवादनासाठी गर्दी केली होती. दुपारी पावणे दोनच्या सुमारास जिल्हा परिषद सदस्य  अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर  (उंडाळकर काका यांचे चिरंजीव)  कार्यकर्त्यांसह तेथे अभिवादानासाठी दाखल झाले. 
ते समाधीस्थळी जात असतानाच पाठोपाठ माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण  तेथे पदाधिकाऱ्यांसह दाखल झाले.

दोघांच्या एकाचवेळी झालेल्या एंन्ट्रीने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. सर्वांच्या नजरा दोघांवर रोखल्या गेल्या. अॅड. उंडाळकर समाधीस्थळी अभिवादन करून समाधीला प्रदक्षिणा घालत असताना आमदार पृथ्वीराज चव्हाण तेथे पोहचले. आता हे दोघे काय बोलणार अशी सर्वांना उत्सुकता होती, पण दोघांनीही एकमेकांकडे पाहणे टाळले. 

अभिवादनासाठी येणाऱ्या मान्यवर, नागरीकांची भेट घेण्यासाठी लगत उभारलेल्या मंडपात  राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील थांबले होते. पण  समाधीस्थळी मान्यवर आल्याचे समजल्याने तेही समाधीस्थळाकडे निघाले. त्यावेळी अभिवादन करून परत जाताना आमदार बाळासाहेब पाटील यांची  अॅड. उंडाळकर यांची भेट झाली. त्यावेळी आमदार पाटील यांनी अॅड. उंडाळकर यांच्याशी हस्तांदोलन केले.  त्यावेळी अॅड. उंडाळकर यांनी समाधीस्थळी अभिवादन करणाऱ्या आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या दिशेने इशारा करत आमदार पाटील यांना बाबा आलेत तिकडे जावा, आम्ही थांबतोय असे सूचित केले.

आमदार पाटील यांचे बंधू जयंत पाटील यांच्यासमवेत अॅड. उंडाळकर लगतच्या मंडपात चहापानासाठी गेले. त्यानंतर आमदार चव्हाण व आमदार पाटील यांनी एकत्र समाधीस अभिवादन केले. तेथून तेही चहापानासाठी मंडपात आले. मात्र मंडपातही काही राजकीय भेटीची घडामोड होईल याच्या उत्सुकतेने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र मंडपाच्या दोन्ही टोकाला दोघेजण बसले. तसेच अॅड. उंडाळकर शिवाजी हायस्कूलच्या 
प्रवेशद्वाराच्या बाजूने बाहेर पडल्याने दोघेही पुन्हा समोरासमर न आल्याने उपस्थितांची उत्सुकता मावळली.     

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख