property details of parth pawar | Sarkarnama

पार्थ यांच्याकडे वीस कोटींची मालमत्ता; आई व भावाचे नऊ कोटींचे कर्ज

उत्तम कुटे
मंगळवार, 9 एप्रिल 2019

पिंपरी : पहिलीच निवडणूक लढविणारे अविवाहीत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे मावळमधील उमेदवार पार्थ पवार यांच्याकडे वीस कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे. त्यात तीन कोटी ६९ लाख ५४ हजार १६३ रुपयांची जंगम, तर १६ कोटी  ४२ लाख ८५ हजार १७० रुपयांची स्थावर मालमत्ता आहे

पदवीधर असलेले पार्थ अविवाहित आहेत. त्यांनी आपला व्यवसाय हा शेती आणि व्यवसाय असल्याचे सांगितले आहे.  जोरदार शक्तिप्रदर्शन करीत त्यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात त्यांनी वरील तपशील दिला आहे. त्यांच्याविरुद्ध एक सुद्धा एफआयआर (गुन्हा) आणि पर्यायाने खटलाही दाखल नाही.

वीस कोटीचे धनी असलेल्या पार्थ यांच्यावर कुठल्या बँकेचे कर्ज नाही. मात्र, आपली आई सुनेत्रा यांना सात कोटी 13 लाख 13 हजार 295, तर लहान भाऊ जय याला दोन कोटी 23 लाख असे एकूण नऊ कोटी 36 लाख 13 हजार 295 रुपयांचे देणे त्यांना आहे.

स्थावर मालमत्तेत शेतीपेक्षा बिगर शेतजमीन असलेली मालमत्ता पार्थ यांच्याकडे अधिक आहे. तर जंगम मालमत्तेत तीन लाख 67 हजार 110 रुपये रोकड त्यांंच्याकडे आहे. बारामतीशिवाय मुळशी तालुक्यातही त्यांची शेतजमीन आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांना वीस लाख रूपये तर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पन्नास लाख रुपये शेअरपोटी अॅडव्हान्स दिल्याचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात आहे.

संबंधित लेख