Problems in Bharip Congress Alliance | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

काँग्रेस-भारिप बहुजन महासंघाच्या महाआघाडीत होणार बिघाडी?

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 24 डिसेंबर 2018

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजप-शिवसेनेला सरकारला पायऊतार करण्यासाठी विरोधी पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. जागा वाटपासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकांचे सत्र अंतीम टप्प्यात असले तरी महाआघाडीतील मित्र पक्षांना जागा वाटपचा गुंता अद्यापही कायमच आहे.

अकोला : आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत भारिप बहुजन महासंघाला समाविष्ट करून घेण्याचा गुंता अधिकच वाढला आहे. भारिपने 12 जागांचा प्रस्ताव काँग्रेस आघाडीला दिला आहे. मात्र, आघाडीने अकोला लोकसभा मतदारसंघच सोडण्याची तयारी दर्शविल्याने जागा वाटपाच्या मुद्यावरून काँग्रेस-भारिप बहुजन महासंघाच्या महाआघाडीत बिघाडी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजप-शिवसेनेला सरकारला पायऊतार करण्यासाठी विरोधी पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली आहे. जागा वाटपासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकांचे सत्र अंतीम टप्प्यात असले तरी महाआघाडीतील मित्र पक्षांना जागा वाटपचा गुंता अद्यापही कायमच आहे. समविचारी पक्ष म्हणुन आघाडीत भारिप बहुजन महासंघाला सहभागी करून घेण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. 

भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी 12 लोकसभा मतदारसंघ सोडण्याचा प्रस्ताव काँग्रेसकडे दिला आहे. मात्र, आघाडीकडून केवळ अकोला लोकसभा मतदारसंघ भारिपला सोडण्याची तयारी दर्शविल्याने जागा वाटपाच्या मुद्यावर भारिप बहुजन महासंघ आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काँग्रेसने सन्मानजनक आघाडी न केल्यास वंचीत बहुजन आघाडी एमअआयएमच्या सोबतीने संपूर्ण राज्यभर स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे भारिपचे नेते म्हणत आहेत. मात्र, जागा वाटपावर अद्यापही बोलणी सुरू असल्याचे काँग्रेस नेते म्हणत असल्याने महाआघाडीचा गुंता कायमच आहे. 

संबंधित लेख