priyanka-road-show-up | Sarkarnama

लखनौ `प्रियांका'मय; `रोड शो'मुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

मी लखनौला येतेय. आपण सर्व मिळून नव्या राजकारणाला सुरवात करूया आणि राजकारणातील बदलामध्ये तुमची प्रमुख भूमिका राहणार आहे. तरुण, महिला आणि विस्थापित या सर्वांचा आवाज एेकला जाईल. चला नवीन भविष्य आणि राजकारण घडवूया.
- प्रियांका गांधी, सरचिटणीस, कॉंग्रेस 

पुणे - कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया काही वेळातच लखनौमध्ये रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत. रोड शोमुळे लखनौमधील वातावरण `प्रियांक'मय झाले असून, कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.    

नेहरु भवन फुलांनी सजवण्यात आले आहे. बऱ्याच वर्षांनंतर नेहरू भवनाचे असे चित्र पाहायला मिळाले आहे. कार्यकर्त्यांनी प्रियांका गांधींच्या स्वागताची जबरदस्त तयारी केली आहे. गाणी गाताहेत. आनंद व्यक्त करणारे टी शर्ट परिधान व्यक्त केले आहेत. प्रियांका गांधी यांच्या होर्डिंगनी सर्व वातावरण `प्रियांका'मय झाले आहे. 

`मॉं दुर्गा का रुप बहन प्रियांका जी/ दहन करो झुठे मक्कारो की लंका बहन प्रियंका बहन प्रियंका' अशा शब्दांत एका कार्यकर्त्यांना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दुसऱ्या एका कार्यकर्त्याने
`आ गई बदलाव की ऑंधी / राहुल संग प्रियंका गांधी' असे प्रियांका गांधी यांचे स्वागत करताना म्हटले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख