prithviraj chavhan criticise modi goverenment in kadegaon | Sarkarnama

मोदी सरकारची काय गत होईल, याची कल्पनाच केलेली बरी : पृथ्वीराज चव्हाण 

संतोष कणसे 
सोमवार, 3 सप्टेंबर 2018

कडेगाव (सांगली) : नरेंद्र मोदी हे हुकूमशहा आहेत. ते पुन्हा निवडून आले तर देशात लोकशाही शिल्लक राहणार नाही. त्यामुळे सर्व विरोधक भाजप सरकारविरुद्ध एकत्र येत आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जनसंघर्ष यात्रे दरम्यान कडेगाव तालुक्‍यात केले. 

ते म्हणाले , 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी सरकारला फक्त 31 टक्के मते पडली तर त्यांच्या मित्र पक्षांसह एकूण 39 टक्के मते पडली असे गृहीत धरुया. 61 टक्‍के मते ही मोदींचा पराभव करण्यासाठी पडली. ही मते विभागली म्हणून मोदी निवडून आले. ही मते जर विभागली गेली नाहीत तर मोदी सरकारची काय गत होईल, याची कल्पनाच केलेली बरी. 

संबंधित लेख