prithviraj chavhan | Sarkarnama

विशेष अधिवेशनासाठी राज्यपालांना भेटणार : चव्हाण 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

कृषी कर्जमाफी व शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाबाबत विशेष
अधिवेशन बोलवावे, या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या आमदारांचे शिष्टमंडळ दोन मे रोजी राज्यपालांची भेट घेणार आहे - पृथ्वीराज चव्हाण 

सातारा :  वस्तू व सेवा करासंदर्भात ज्या प्रमाणे सरकारने तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले, त्यानुसार कृषी कर्जमाफी व शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाबाबत विशेष 
अधिवेशन बोलवावे, या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या आमदारांचे शिष्टमंडळ दोन मे रोजी राज्यपालांची भेट घेणार आहे, अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज
चव्हाण यांनी दिली. 

शेतकरी कर्जामाफीसह तूर प्रश्‍नी विरोधक आक्रमक असून महाराष्ट्र दिनी (एक मे) जिल्हा व तालुकास्तरावर ध्वजवंदनानंतर विरोधी पक्षांच्या आमदारांकडून संबंधित
जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदारांना दहा किलो तूर भेट दिली जाणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाचवा, तूर विकत घ्या असे आवाहन यानिमित्ताने शासनाकडे केले जाणार आहे, असे श्री. चव्हाण व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार शेतकऱ्यांनी तूर लावली आहे. त्यामुळे सरकारने तूर खरेदी प्राधान्य द्यावे'. यावेळी आमदार डॉ. पतंगराव कदम, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी, जोगेंद्र कवाडे, आमदार जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते. 

संबंधित लेख