पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यामुळे पुण्यातील काॅंग्रेस नेत्यांच्या भुवया उंचावल्या

पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यामुळे पुण्यातील काॅंग्रेस नेत्यांच्या भुवया उंचावल्या

पुणे, ता. 12 : आगामी लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र, पुणे लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाने लढायचे हे अद्याप ठरलेले नाही, असे कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी सांगितले.

दुसरीकडे हा मतदारसंघ काॅंग्रेसकडेच राहणार हे गृहित धरून पुण्यातील काॅग्रेस नेत्यांनी इच्छुकांची नावे निश्चित करून तीन दिवस होण्याच्या आधीच चव्हाण यांच्या या विधानामुळे पुण्याचा मतदारसंघ काॅंग्रेसकडेच राहणार की नाही, याबाबत आता तर्क सुरू झाले आहेत.

पुण्यातील काॅंग्रेस नेत्यांनी चार प्रबळ इच्छुकांची नावे प्रदेशला कळवून तयारीही सुरू केली होती. यात आमदार अनंत गाडगीळ, अभय छाजेड, अनंत गाडगीळ, अरविंद शिंदे यांचा समावेश आहे. हे नेते आता गोंधळात पडले आहेत.
 
आगामी निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय दोन्ही कॉंग्रेसने घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठकांचे सत्र सुरू असून, मतदारसंघनिहाय आढावा घेऊन वाटाघाटी करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर दोन्ही कॉंग्रेसमध्ये काही जागांबाबत एकमत झाल्याचे सांगण्यात आले. परंतु, पुण्यातून राष्ट्रवादीचा उमेदवार लढणार असल्याची घोषणा या पक्षाचे नेते अजित पवार यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती. तेवढेच नव्हे तर हा मतदारसंघ जिंकण्यासाठी राष्ट्रवादीकडे तगडा उमेदवारही आहे, असेही पवार यांनी सांगितले होते.

त्यावरून शहर कॉंग्रेसच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत, ही जागा सोडणार नसल्याचे राष्ट्रवादीला बजाविले होते. त्यातच लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसमधून चारजण इच्छुक असून, त्यांची नावे प्रदेश समितीकडे पाठविली आहेत. या पार्श्‍वभूमीवर चव्हाण यांनी मात्र, पुण्याची जागा कोणत्या पक्षाने लढवायची हे निश्‍चित झाले नसल्याचे सांगितले. त्यामुळे कॉंग्रेसच्या वर्तुळात अस्वस्थता निर्माण झाली आहे. चव्हाण म्हणाले, ""भाजपला हरविण्यासाठी दोन्ही कॉंग्रेसची आघाडी होणार असून, त्याबाबत आता पुन्हा बैठका होणार आहेत. तेव्हा सविस्तर चर्चा होईल. आघाडी मजबूत करण्यासाठी अन्य पक्ष आणि संघटनांसोबत घेण्याचा प्रयत्न आहे. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकरांशी चर्चा सुरू आहे. ''
 
""भाजप सरकारला विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढविता येणार नाही. तशी ठोस कामगिरी या पक्षाला करता आली नाही. त्यामुळे शहरांची नावे बदलून धार्मिक मुद्दा पुढे आणत आहे. मात्र, भाजपचा पराभव निश्‍चित आहे, हे त्यांनाही कळून चुकले आहे,'' असे चव्हाण म्हणाले. 

दरम्यान, चव्हाण यांनी पत्रकार परिषद संपताच कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. पुण्यात कॉंग्रेसला मानणारा पारंपरिक मतदार आहे. त्यामुळे  दरम्यान, चव्हाण यांनी पत्रकार परिषद संपताच कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. पुण्यात कॉंग्रेसला मानणारा पारंपरिक मतदार आहे. त्यामुळे हा मतदारसंघ सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com