Prithviraj Chavans Statement About Congress Bharip Alliance | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

काँग्रेस-भारिप आघाडीत ‘पृथ्वीबाबां’चे विघ्न!

मनोज भिवगडे 
रविवार, 9 डिसेंबर 2018

धर्मनिरपेक्ष पक्षांना सोबत घेवून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात महाआघाडी स्थापनेचे प्रयत्न सुरू केले आहेत. या आघाडीचा एक भाग ॲड. प्रकाश आंबेडकरही असावेत असा प्रयत्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याकडून सुरू आहे. मात्र, महाआघाडीत एमआयएमला स्थान राहणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे. एमआयएमला वंचित बहुजन आघाडीत स्थान दिल्यामुळे ॲड. प्रकाश आंबेडकरांसोबतच्या आघाडीबाबत काँग्रेसने सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. 

अकोला : 'आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ॲड. प्रकाश आंबेडकर प्रणीत वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा सुरू आहे. चार वेळा बैठका झाल्यात. प्रस्ताव दिले, पण त्यांच्याकडून कोणतेही उत्तर नाही,' या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याने काँग्रेस-भारिप बहुजन महांसघ आघाडीत विघ्न टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

धर्मनिरपेक्ष पक्षांना सोबत घेवून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात महाआघाडी स्थापनेचे प्रयत्न सुरू केले आहेत. या आघाडीचा एक भाग ॲड. प्रकाश आंबेडकरही असावेत असा प्रयत्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याकडून सुरू आहे. मात्र, महाआघाडीत एमआयएमला स्थान राहणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे. एमआयएमला वंचित बहुजन आघाडीत स्थान दिल्यामुळे ॲड. प्रकाश आंबेडकरांसोबतच्या आघाडीबाबत काँग्रेसने सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. 

त्यातच जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने पश्‍चिम विदर्भाच्या दौऱ्यावर असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भारिप-बमसंसोबतच्या आघाडीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. चव्हाण आपली बदनामी करीत असल्याचा आरोप केल्याने आता काँग्रेस-भारिप आघाडीत ‘पृथ्वीबाबां’चे विघ्न येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसला नको आंबेडकरांची साथ
ॲड. आंबेडकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांवर निशाणा साधण्याची एकही संधी आतापर्यंत सोडलेली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सुरू असलेल्या महाआघाडीतही राष्ट्रवादीने ॲड. आंबेडकर यांच्याबाबत स्पष्ट भूमिका घेत काँग्रेसने त्यांच्या वाट्यातील जागाच भारिप-बमसंला द्यावा, असे जाहीर केले आहे. यावरून राष्ट्रवादीलाही ॲड. आंबेडकरांची साथ नको असल्याचे स्पष्ट होते.  
  
‘उपरा'कारांची महत्त्वाकांक्षा

‘मला त्यांनी लोणच्यासारखं वापरलं म्हणून मी चाळीस वर्षांचे संबंध तोडले आहेत. त्यांना मी आता काही मागणार नाही. आता आम्ही मागणारे नाही तर देणारे आहोत. आता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे. मी का मुख्यमंत्री होऊ नये?,' असा सवाल 'उपरा'कार, माजी आमदार तथा वंचित आघाडीचे नेते लक्ष्मण माने उपस्थित केला आहे.

काँग्रेस नेत्यांच्या आघाडीबाबत गप्पाच!
‘आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने वंचित बहुजन आघाडीला बारा जागा देण्याची मागणी आम्ही केली आहे. मात्र, त्यावर काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. काँग्रेसचे नेते आघाडीसंदर्भात केवळ गप्पाच करतात,’ असे मत माजी आमदार तथा वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक हरिदास भदे यांनी व्यक्त केले आहे.  

संबंधित लेख