prithviraj chavan reaction about priyanka gandhi | Sarkarnama

हा तर राहुल गांधींनी दिलेला आश्‍चर्याचा धक्का!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 23 जानेवारी 2019

उत्तर प्रदेश हे कॉंग्रेससाठी अवघड राज्य आहे.

कऱ्हाड (सातारा): "प्रियांका गांधी यांना कॉंग्रेस पक्षाचे महासचिव करून अर्ध्या उत्तर प्रदेशची जबाबदारी दिली आहे. हा कॉंग्रेस पक्षाला राहुल गांधींनी दिलेला आश्‍चर्याचा धक्का आहे,'' अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज प्रियांका यांच्या निवडीनंतर व्यक्त केली. 

चव्हाण म्हणाले, "प्रियांका गांधी यांनी सक्रिय राजकारणात यावे म्हणून अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्या कौटुंबिक स्थितीमुळे त्या जबाबदारी टाळत होत्या. त्यांना अनेकदा निवडणूक लढवण्याचेही निमंत्रण देण्यात आले होते. त्यांनी कौटुंबिक परिस्थिती लक्षात घेऊन हा चांगला निर्णय घेतला आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या निवडणूक तयारीला चांगला वेग येईल. उत्तर प्रदेश हे कॉंग्रेससाठी अवघड राज्य आहे. ज्योतिरादित्य सिंधिया आणि प्रियांका गांधी यांना प्रत्येकी निम्म्या राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे. युवकांचा पक्षाशी संपर्क वाढविण्यात त्यांचा निश्‍चितच सिंहाचा वाटा राहील. राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे हा निवडणुकीसाठी तात्पुरता निर्णय नसून तो लॉंगटर्म निर्णय आहे. त्यातून त्या उत्तर प्रदेशमध्ये कॉंग्रेसला उभारी देतील. त्यामुळे निवडणुकीला चांगला फायदा होईल.  

संबंधित लेख