prithviraj chavan ram temple ayodya | Sarkarnama

 निवडणुका आल्याकी राममंदिराचा मुद्दा बाहेर काढला : पृथ्वीराज चव्हाण 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 25 नोव्हेंबर 2018

सातारा : रामाच्या नावावर सारखी सारखी मते मिळत नाहीत आणि यश ही मिळत नाही. चार वर्षात राम मंदिराचा मुद्दा सरकारला आठवला नाही. निवडणुका जवळ आल्या की हा मुद्दा बाहेर काढला आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. 

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त कराड येथील त्यांच्या समाधीस अभिवादन केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

सातारा : रामाच्या नावावर सारखी सारखी मते मिळत नाहीत आणि यश ही मिळत नाही. चार वर्षात राम मंदिराचा मुद्दा सरकारला आठवला नाही. निवडणुका जवळ आल्या की हा मुद्दा बाहेर काढला आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. 

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त कराड येथील त्यांच्या समाधीस अभिवादन केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

ते म्हणाले, शिवसेना व भाजप निवडणुकीच्या तोंडावर राममंदिर चा मुद्दा काढला आहे. या पूर्वी 1996 ला याचे परिणाम आम्हाला भोगावे लागले. दरवेळी तेच तेच चालणार नाही. गेल्या चार वर्ष्यात विकास कामाच्या मुद्द्यावर भाजप शिवसेना सरकार पुर्णपणे अपयशी ठरले आहे, आता हातात काही नाही म्हणून राममंदिराचा मुद्दा भावनिक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस मध्ये लोकसभेसाठी जागा वाटप कुठपर्यंत आले आहे, या प्रश्नावर श्री. चव्हाण म्हणाले, जागा वाटपावर खेळीमेळीच्या वातावरणात तीन ते चार बैठका झाल्या आहेत. 85 % काम पूर्ण झाले आहे. आता काही ठिकाणी उमेदवार पाहून निर्णय घेतला जाईल. देशभर मोदी विरोधात एकच उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न आहे. 

मराठा आरक्षणाबाबत ते म्हणाले, ""मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना आमचा पाठिंबा आहे, त्यासाठीचे सर्व श्रेय त्यांनी घेतले तरी आमची हरकत नाही. पण फसवले तर मराठा समाज माफ करणार नाही. मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न एक ज्युनिअर मंत्र्यांकडे देऊन त्याचा शासन निर्णय काढला आहे. माझ्या राजकीय वाटचालीत मी प्रथमच असा शासन निर्णय पहिला आहे. कायदा करताना तो कॅबिनेटकडे आला पाहिजे. तो कॅबिनेट कडे न आणता परस्पर पास करणे योग्य होणार नाही.'' 

माझे मत आहे की तो कायदा पूर्ण तपासला पाहिजे आणि तो पूर्ण मंत्रिमंडळाकडे आला पाहिजे. त्यावर मतभेद नसतील तर तो विधिमंडळा कडे आणून त्याला मंजुरी दिली गेली पाहिजे. त्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले तरी आमची तयारी आहे. पण सरकारने पूर्व तयारी केलेली नाही चारवर्षं वाया घालवली. आता एक होकार किंवा नकार होणार होता पण होकार असताना त्यांनी तयारी केली नाही त्यामुळे यामध्ये कुठेतरी पाल चुकचुकते आहे असे वाटत आहे. तरीही आमचा त्यांना पाठिंबा आहे, मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

संबंधित लेख