prithviraj chavan may be contest from pune | Sarkarnama

पुण्यातून लोकसभेसाठी पृथ्वीराज चव्हाणांची चाचपणी ! 

उमेश घोंगडे 
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

पुणे : लोकसभा निवडणुकीला तब्बल दीड वर्ष बाकी असताना पुण्यातील लोकसभेची जागा कॉंग्रेसकडून कोण लढवणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पुण्यातील काही इच्छुकांबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेही नाव चर्चेत असून त्यांच्याकडून तशी चाचपणीदेखील करण्यात येत असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगतिले. 

पुणे : लोकसभा निवडणुकीला तब्बल दीड वर्ष बाकी असताना पुण्यातील लोकसभेची जागा कॉंग्रेसकडून कोण लढवणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पुण्यातील काही इच्छुकांबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेही नाव चर्चेत असून त्यांच्याकडून तशी चाचपणीदेखील करण्यात येत असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगतिले. 

गेल्या निवडणुकीत प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विश्‍वजीत कदम यांनी निवडणूक लढवली होती. त्यानंतर विधानसभा व महापालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे पुरते पानिपत झाले. गेल्या पन्नास वर्षात प्रथमच पुण्यात कॉंग्रेसची अशी दयनीय अवस्था आहे. संघटनेच्या पातळीवर तर यापेक्षा भीषण परिस्थिती आहे. पूर्वीपेक्षा अधिक गटतटात कॉंग्रेस दुभंगलेली आहे. लोकसभेसाठी अनेक इच्छुक तयार आहेत. आमदार अनंत गाडगीळ यांच्यापासून अनेकांचा यात समावेश आहे. विश्‍वजीत कदम यांचीही तयारी आहे. सांगली किंवा पुणे मतदारसंघात राहूल गांधी आदेश देतील त्याप्रमाणे काम करण्याची तयारी कदम यांनी ठेवली आहे.

या पार्श्‍वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाच्या चर्चेने आणि त्यांनी सुरू केलेल्या चाचपणीने कॉंग्रेसचे पदाधिकारी अवाक झाले आहेत. चव्हाण यांनी केंद्रात मंत्री म्हणून काम केले आहे. राज्यात मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. गांधी कुटुंबियांसह पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचा त्यांच्यावर अधिक भरवसा आहे. यामुळे त्यांनी पुण्यातून इच्छा व्यक्त केल्यास त्यास श्रेष्ठींकडून परवानगी मिळण्यास फार अडचण येण्याचे कारण नाही, असे या सूत्रांनी सांगितले. चव्हाण यांची उमेदवारी नक्की झाल्यास पुण्यातील गटबाजीचा प्रश्‍नच निकालात निघेल. सारे गट-तट चव्हाण यांच्यासाठी काम करतील. चव्हाण यांची स्वच्छ प्रतिमा पक्षाच्या कामी येईल, हा या मागचा होरा आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत शहर कॉंग्रेसची जबाबदारी चव्हाण यांच्याकडेच होती. त्यांच्या नेतृत्वाखालीच उमेदवारी देण्यात आली होती. पुण्याची जबाबदारी त्यावेळी त्यांच्याकडे निवडणुकीपुरती प्रभारी स्वरूपाची होती. मात्र पुण्यातील गट-तट आणि अंतर्गत राजकारणाची चव्हाण यांना चांगली जाण आहे. याचा फायदा त्यांना होऊ शकतो, असे या सूत्रांचे मत आहे. 
 

संबंधित लेख