पृथ्वीराज चव्हाण यांनाही पुण्यातल्या राजकीय गप्पांच्या कट्ट्यांची भुरळ

चव्हाण यांचा स्वभाव भिडस्त असल्याने कार्यकर्त्यांत मिसळणे त्यांच्याशी गप्पा मारणे फारसे होत नसे. मात्र गेल्या तीन वर्षात चव्हाण यांच्या मूळ स्वभावात मोठा फरक पडला आहे. ज्या ठिकाणी जातील तेथे कार्यकर्त्यांत मिसळण्याची त्यांच्याशी चर्चा करण्याची सवय त्यांनी लावून घेतली आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनाही पुण्यातल्या राजकीय गप्पांच्या कट्ट्यांची भुरळ

पुणे : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शिस्तप्रियतेसाठी प्रसिद्ध आहेत. मात्र रविवारी ही शिस्त काहीशी बाजूला ठेवत पुण्यातील काही मोजक्‍या नेत्या-कार्यकर्त्यांसह त्यांनी एका हॉटेलमध्ये बटाटा वड्याचा आस्वाद घेत राजकिय-सामाजिक विषयावर गप्पा मारल्या. पुण्यातील अनौपचारिक राजकिय गप्पांचे कट्टे असलेल्या टिळक रस्ता तसेच फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील अशा कट्‌य्यांची माहिती घेत स्वत: जमेल तेव्हा हजेरी लावण्याचेही त्यांनी मान्य केले. 

रविवारी चव्हाण एका कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. टिळक स्मारक मंदीरातील कार्यक्रम संपल्यानंतर पुण्यातील कॉंग्रेसचे नेते उल्हास पवार तसेच डॉ. सतीश देसाई, गोपाळ तिवारी, संजय बालगुडे यांच्यासह शेजारच्या हॉटेलमध्ये पोचले. येथील वडा चांगला असल्याचे सांगताच त्यांनी वडा घेतला. मात्र त्यातील बटाट्याचे प्रमाण पाहून त्यांनी थोडासा खाल्ला त्यानंतर चहा पित-पित त्यांनी पुण्यातील राजकीय तसेच सामाजिक विषयावर गप्पा मारल्या.

गप्पांच्या ओघात पुण्यातील चवदार पदार्थ मिळण्याची ठिकाणे व त्यानिमित्ताने राजकिय कार्यकर्ते व पत्रकारांच्या गप्पांच्या कट्टे कोणते या विषयावर चर्चा झाली. पवार यांनी त्यांना टिळक रस्त्यावरील गिरीजा तसेच फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील रूपाली हॉटेलवर जमणाऱ्या राजकीय कट्ट्यांची माहिती चव्हाण यांना दिली. वेळ मिळेल तसा या कट्टयांवर आपणही जाऊ, असे सांगत त्यांनी निरोप घेतला. दरम्यान, चव्हाण हॉटेलमध्ये आलेत हे पाहून हॉटेलमधील अनेकांनी त्यांच्यासोब फोटो सेशन केले. 

चव्हाण यांचा स्वभाव भिडस्त असल्याने कार्यकर्त्यांत मिसळणे त्यांच्याशी गप्पा मारणे फारसे होत नसे. मात्र गेल्या तीन वर्षात चव्हाण यांच्या मूळ स्वभावात मोठा फरक पडला आहे. ज्या ठिकाणी जातील तेथे कार्यकर्त्यांत मिसळण्याची त्यांच्याशी चर्चा करण्याची सवय त्यांनी लावून घेतली आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर विधी मंडळात आणि बाहेरही चौफेर टीका करण्यात सध्या चव्हाण आघाडीवर आहेत. अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष व राधाकृष्ण विखे पाटील विरोधीपक्ष नेते असले तरी कॉंग्रेसचे खरे नेतृत्व सध्या चव्हाण यांच्याकडेच आहे. या पाश्‍वभूमीवर कार्यकर्त्यांत मिसळून त्यांना आपलेसे करण्याची चव्हाण यांची भूमिका कॉंग्रेस कार्यकर्त्यांना उत्साह वाढविणारी आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com