prithviraj chavan attack bjp government | Sarkarnama

भाजप राजवटीत पुरोगाम्यांचे हत्यारे मोकाट ही शोकांतिका : पृथ्वीराज चव्हाण 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

कऱ्हाड : यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते आणि माझ्या वडिलांसारख्या समाजधुरीणांनी पुरोगामी विचार जोपासला. मात्र भाजपच्या राजवटीत पुरोगामी विचारांची हत्या करणारे गुन्हेगार सापडत नाहीत, ही शोकांतिकाच आहे, अशी खंत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. 

वारुंजी (ता. कऱ्हाड) येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर वारुंजी-केसे-पाडळी रस्त्याचे काम तसेच आमदार आनंदराव पाटील, जिल्हा परिषद सदस्या मंगल गलांडे व पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील यांच्या निधीतील विकास कामांच्या प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते.
 
चव्हाण म्हणाले, केंद्र सरकारची आर्थिक परिस्थिती खालावल्याने जुलमी करवसुली सुरु आहे. सव्वाचार वर्षात जनतेच्या खिशातून 21 लाख कोटी काढले आहेत. मोदी सरकार अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेऊ शकलेले नाही. तर राज्यातील फडणवीस सरकारच्या काळात एक टक्कादेखील कृषीविकास झालेला नाही. राफेल विमान खरेदीत 30 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे राहुल गांधींनी सभागृहासमोर मांडले आहे. तिप्पट किंमतीने हा व्यवहार करून मोदींनी अंबानींना मागील दराने मदत केल्याचे त्यांच्याच गोटातील चर्चेतून ऐकायला मिळते, हे खेद जनक आहे. 

आमदार पाटील म्हणाले, भाजपच्या कटुनीतीला कॉंग्रेसच्या जीवावर मोठे झालेले भुलले आहेत. पृथ्वीराजबाबांवर टिका करणाऱ्या कोल्हापुरातील नेत्यांचा कराड दक्षिणमधील जनता योग्यवेळी समाचार घेईल. 

संबंधित लेख