Prithviraj Chanvan Didn't wear Chappals for six years | Sarkarnama

अन्‌ पृथ्वीराज चव्हाणांनी सहा वर्षे चप्पलच घातली नाही! 

संपत देवगिरे 
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

येथील ज्योती स्टोअर्स संस्थेने 'लेखक तुमच्या भेटीला' या उपक्रमात त्यांना निमंत्रित केले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हेमंत टकले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घेतली. त्यात त्यांनी अनेक कौटुंबिक, व्यक्तीगत, राजकीय अन्‌ शालेय आठवणींना उजाळा दिला. 

नाशिक : खासदाराची मुलं असली की खुप चैनीत राहतात. असा कोणाचाही समज असतो. आजची स्थिती पाहिली तर त्यात फारसे गैर नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील खासदार होते. त्यावेळी शाळेत जातांना वर्गातली मुले अनवाणी असतात. म्हणुन पृथ्वीराज चव्हाण यांनी पाच- सहा वर्षे चप्पलच घातली नाही. ते शाळेत अनवाणीच जात यावर कोणाचा विश्‍वास बसेल का? मात्र बालपणीच्या या प्रेरणादायी आठवणींना त्यांनी स्वतःच उजाळा दिला आहे. 

येथील ज्योती स्टोअर्स संस्थेने 'लेखक तुमच्या भेटीला' या उपक्रमात त्यांना निमंत्रित केले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हेमंत टकले यांनी त्यांची मुलाखत घेतली. त्यात त्यांनी अनेक कौटुंबिक, व्यक्तीगत, राजकीय अन्‌ शालेय आठवणींना उजाळा दिला. 

1962 मध्ये वडील आनंदराव हे कराड मतदारसंघाचे खासदार होते. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिलीला त्यांनी प्रवेश घेतला. शाळेच्या पहिल्या दिवशी आईने त्यांना अंघोळ घातली. मस्त बाबासुट घातला. पायात रेशमी बुट घातले. दप्तर घेऊन त्या शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत सोडायला आल्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी मातीच्या भिंतीच्या त्या शाळेच्या वर्गात प्रवेश केला. त्यांनी प्रवेश करताच शिक्षकासह, सगळे विद्यार्थी 'हा कोण अन्‌ कुठून आलाय?' अशा आश्‍चर्याने पाहात राहिले.

वर्गातल्या एकाही मुलाकडे धड कपडेही नव्हते. एकाच्याही पायात पायताण (चप्पल) नव्हते. तो अनुभव घेऊन ते घरी गेले. मात्र, दुसऱ्या दिवसापासून त्यांनी चप्पल घालने सोडले. पुढे पाच, सहा वर्षे कराडमध्ये राहिले. तोपर्यंत त्यांनी कधीही चप्पल घातली नाही. अनवाणीच राहीले. ही आठवण चव्हाण यांनी स्वतः सांगितली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख