pritam athavale | Sarkarnama

मंत्रालयातील माजी अधिकारी  प्रीतम आठवले "आरपीआय'मध्ये

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 13 जुलै 2017

मुंबई : मंत्रालयात सहसचिव, सचिव पदावर असताना आपल्या कामाचा कायम दबदबा निर्माण करणारे माजी अधिकारी व मंत्रालाय कर्मचारी-अधिकारी कल्याण संघटनेचे प्रमुख पदाधिकारी प्रीतम आठवले यांनी आज रिपब्लिकन पक्षात(आठवले गट) प्रवेश केला. 

प्रीतम आठवले यांनी निवृत्तीनंतर लगेचच 2009 मध्ये कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तिथे त्यांनी योजना समितीचे सचिव, रोजगार विभागाचे अध्यक्ष आदी पदावर काम पाहिले. तसेच मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाच्या सल्लागार आदी पदावर काम केले असून मंत्रालयातील एससी-एसटी कर्मचारी-अधिकारी संघटनेचे ते प्रमुख पदाधिकारी म्हणूनही अनेक वर्षे काम पाहिले आहे. त्यांना रिपाइंच्या योजना प्रकल्पाचे अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आज पक्षाचे नेते अविनाश महातेकर यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. 
 
संबंधित लेख