press room issue | Sarkarnama

"पारदर्शक' कारभार पत्रकार कक्षाच्या मुळावर 

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 8 एप्रिल 2017

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 31 वर्षे जुना व अत्यंत सोईचा असा महापालिका भवनाच्या तिसऱ्या मजल्यावरील पत्रकार कक्ष हटविण्याच्या हालचाली
पालिका प्रशासनाने सुरू केल्या आहेत.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 31 वर्षे जुना व अत्यंत सोईचा असा महापालिका भवनाच्या तिसऱ्या मजल्यावरील पत्रकार कक्ष हटविण्याच्या हालचाली
पालिका प्रशासनाने सुरू केल्या आहेत.

स्थायी समिती सदस्य व त्यातही महिला सदस्यांकरिता पुरेशी जागा व्हावी या उद्देशाने हा कक्ष स्थायीच्या दालनाला
जोडण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते, स्थायी समितीसह विविध विषय समित्यांची कार्यालये असलेल्या या मजल्यावरील हा
कक्ष पत्रकार व त्यांना भेटायला येणाऱ्यांच्याही दृष्टीने सोईचा आहे.आतापर्यंत त्याचा कधीही सत्ताधारी व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना अडसर नव्हता. मात्र, पारदर्शी कारभाराच्या मुद्यावर पालिकेत प्रथमच सत्तेत आल्यानंतर पारदर्शक व स्वच्छ कारभारासाठी जागल्याची (वॉच डॉग) भूमिका बजावणारा हा कक्ष स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याला पत्रकारांनी तीव्र विरोध केला आहे. 
 

संबंधित लेख