president's convoy stops to give way to ambulance | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

जेंव्हा राष्ट्रपतींच्या वाहनांचा ताफा थांबून रुग्णवाहिकेला वाट करून देतो !

पीटीआय
शुक्रवार, 14 जुलै 2017

मुर्शिदाबाद (पश्‍चिम बंगाल) : राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री एवढेच काय एखाद्या मंत्री महोदयांचा वाहनांच्या ताफ्यासह एखाद्या शहरातून प्रवास सुरु असला की  तेवढा वेळ वाहतुकीचा खोळंबा होणारच हा जणू अलिखित नियमच झाला आहे .  

जेव्हढी राजकीय व्यक्ती मोठी तेवढा वाहनांचा ताफाही मोठा . जागोजागी सुरक्षेच्या नावाखाली रस्ता रोकोचा असतो . सामान्य माणूस मात्र यात भरडला जातो .  अशी आपल्या देशाची परंपरा असल्याने राष्ट्रपतींच्या भव्य ताफ्याने एका रुग्णवाहिकेला वाट करून द्यावी ही सर्वसामान्यांना सुखाचा धक्का देऊन जाते . 

त्याचे झाले असे की , राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या ताफ्याने आज राष्ट्रीय महामार्गावरून जाताना एका रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करून दिल्याची घटना  पश्‍चिम बंगाल मधील  मुर्शिदाबाद   येथे घडली. 

 राष्ट्रपती मुखर्जी यांचे दोन दिवसांच्या पश्‍चिम बंगालच्या दौऱ्यावर आज येथे आगमन झाले. मुखर्जी हे मुर्शिदाबाद येथील हेलिपॅडपासून 25 किलोमीटरवर असलेल्या कानिडीघी येथे एका शाळेचे उद्‌घाटन करण्यासाठी जात असताना ही घटना घडली, असे सूत्रांनी सांगितले.

या महामार्गावरून राष्ट्रपती मुखर्जी यांचा ताफा जात असताना ताफ्यातील शेवटच्या गाडीला रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज आल्यानंतर वेळ न दवडता या ताफ्यातील वाहनांनी रुग्णवाहिकेला जाण्यासाठी मार्ग करून दिला.

अर्थात राष्ट्रपती महोदयांच्या संमतीशिवाय किंवा ते या कृतीस आक्षेप घेणार नाहीत अशी खात्री असल्याशिवाय कोणीही अधिकारी  हे धाडस करणे अवघड आहे . ज्या रुग्णवाहिकेला राष्टपतींच्या वाहनांच्या ताफ्याने वाट करून दिली त्या   रुग्णवाहिकेत कोण होते याची माहिती लगेच समजू शकली नाही. 

संबंधित लेख