राष्ट्रपती निवडणूक : महाराष्ट्रात विरोधकांची मते फोडण्यासाठी भाजपची फिल्डिंग !

bjp-congress-symbol
bjp-congress-symbol

मुंबई:  राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील  विरोधी पक्षांची मते फोडण्यासाठी भाजपचे नेते सक्रिय झाले असल्याचे वृत्त आहे . 

महाराष्ट्रात विरोधी पक्षातील काही आमदार सत्ताधाऱ्यांच्या विशेषत: भाजपच्या संपर्कात आहेत. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत कोणताही व्हीप नसल्याने मते फुटू शकतात, अशी भीती राजकीय व्यक्‍त केली जाते आहे. मते एकत्रित राखणे विरोधी पक्षासाठी अत्यंत आवश्‍यक आहे.

त्यामुळेच प्रत्येक पक्षाने आपापल्या आमदारांची जबाबदारी काही महत्त्वाच्या आमदारांवर सोपवली आहे. हे  आमदार मते एकत्र ठेवण्याचे काम करतील, अशी खात्री महाराष्ट्राचे प्रभारी कॉंग्रेस नेते मोहन प्रकाश यांना आहे. फडणवीस सरकार आपल्याला अनेकांचे समर्थन आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यासाठी ज्या आमदारांवर लक्ष ठेवून आहेत, त्यांना नेतृत्वाने समजावून सांगितले आहे, असे सूत्रांनी सांगितले.

असे असले तरी भाजपतर्फे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातून जादा  मते मिळवायचीच यासाठी अतिशय काळजीपूर्वक फिल्डिंग लावण्यात आली आहे .  राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत व्हीप नसल्याने खऱ्या अर्थाने गुप्त मतदान  होणार आहे . त्यामुळे  काही आमदार भाजपच्या गळाला लागले असल्याचे वृत्त आहे . 


 दरम्यान ,राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी यूपीएने रिंगणात उतरवलेल्या उमेदवार मीरा कुमार मतदारांना आवाहन करण्यासाठी मुंबईत येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी कॉंग्रेसने राष्ट्रवादीसह जयंत पाटील यांच्या नेतृत्वातील शेकाप, अबू  आझमी यांचा समाजवादी पक्ष आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या रिपब्लिकन पक्षाला सोबत घेतले आहे. 
कवाडे गटाकडे मते नसली तरी त्यांच्यामुळे मीरा कुमार यांना समर्थन देणारा एक पक्ष मात्र वाढला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com