president medal for shahaji umap | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

आयपीएस शहाजी उमाप यांना राष्ट्रपती पदक जाहीर

भरत पचंगे
शुक्रवार, 25 जानेवारी 2019

शिक्रापूर : मुंबईतील पोलिस परिमंडळ सहाचे उपायुक्त शहाजी उमाप आणि शिरूर तालुक्यातील जातेगावचे सुपूत्र शहाजी उमाप यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.

शिक्रापूर : मुंबईतील पोलिस परिमंडळ सहाचे उपायुक्त शहाजी उमाप आणि शिरूर तालुक्यातील जातेगावचे सुपूत्र शहाजी उमाप यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.

कडक व शिस्तप्रिय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमाप यांनी विविध ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटविलेला आहे. राज्यात १९९६ मध्ये झालेल्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ते उपअधीक्षकांत प्रथम आले होते. आंबेजोगाई, लातूर, कोल्हापूर येथे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून तसेच कोल्हापूर व नांडेड येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले. नांदेडचे पोलिस अधीक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कारकिर्दीत २०१२ मध्ये तंटामुक्ती योजनेत नांदेड जिल्हा राज्यात प्रथम आला होता. एक हजारांहून अधिक गावे त्यांनी तंटामुक्त केली होती. पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई येथेही त्यांनी पोलिस उपायुक्त म्हणून काम पाहिले.

त्यांना या आधी पोलिस महासंचालकांचा सन्मानचिन्ह मिळाले आहे. 

उमाप हे कुटुंबीय शिक्रापूर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. त्यांचे ज्येष्ठ बंधू कांतिलाल उमाप हे राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त आहे. दुसरे बंधू सुभाष उमाप हे शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती आहेत. तिसरे बंधू राजेंद्र हे पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत. चौथे बंधू संभाजी हे सहायक विक्रीकर आयुक्त आहेत. 

संबंधित लेख