PRESIDENT ELECTION AND PAWAR | Sarkarnama

राष्ट्रपती पदासाठी पवारांनी नाही म्हणू नये : प्रतिभा पाटील

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 1 जून 2017

पुणे : ``राष्ट्रपतीपदाच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव घेतले जात आहे. त्यांचा त्यासाठी नकारही असल्याचे मी ऐकले आहे. परंतु राष्ट्रपतीपदासाठी त्यांनी नाही म्हणू नये.  ते कधी सल्ला मागत नाहीत, परंतु मी माझे विचार सांगते,`` असे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी म्हटले आहे.

बालगंधर्व येथे एका कार्यक्रमात बोलताना प्रतिभाताई पाटील व शरद पवार एकत्र आले होते. या कार्यक्रमात प्रतिभाताई यांनी पवार यांनी राष्ट्रपतीपदासाठी नाही म्हणू नये अशी इच्छा व्यक्त केली.

पाटील म्हणाल्या की राजकारणात मी शरद पवारांना सिनियर आहे. शरद पवारांची स्मरणशक्ती विलक्षण आहे. आपल्या मतदार संघातील कार्यकर्त्यांसोबतच विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांची नावे त्यांना माहीत असतात. ते एक विलक्षण बुद्धिमत्ता असलेले व्यक्तित्व आहेत. शरदरावांनी राजकारणातील 50 वर्षे पूर्ण केली. ही खूप मोठी बाब आहे. वेगवेगळ्या राजछटांचे व्यक्तीमत्व म्हणजे शरद पवार. 50 वर्षानंतर जेव्हा कधी भारतातील राजकारणाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख होईल.
पवार यांनी महिला धोरण आणून सत्तेत महिलांना वाटा दिला. या धोरणाला २५ वर्षे आणि त्यांच्या संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.

संबंधित लेख