preetam munde rally | Sarkarnama

खासदार प्रीतम मुंडेंची परळी-सावरगाव रथयात्रा! 

सरकारनामा ब्युराे
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

पुणे: ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत सावरगाव घाट (ता. पाटोदा. जि. बीड) या ठिकाणी होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी बीडच्या खासदार प्रीतम मुंडे रथयात्रा काढणार आहेत. 

पुणे: ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत सावरगाव घाट (ता. पाटोदा. जि. बीड) या ठिकाणी होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी बीडच्या खासदार प्रीतम मुंडे रथयात्रा काढणार आहेत. 

गतवर्षी भगवानगडावरील दसरा मेळाव्याचा मुद्दा तापल्यानंतर पंकजा समर्थकांनी गडाच्या पायथ्याला मेळावा घेतला होता. या मेळाव्यासाठी गोपीनाथगड (परळी) ते भगवानगड अशी रथयात्रा खासदार प्रीतम मुंडे यांनी काढली होती. या रथयात्रेत हजारो लोक सहभागी झाले होते. यंदाही भगवानगडावर मेळावा होण्यासाठी प्रयत्न सुरु होते, मात्र गडाचे महंत आणि प्रशासनाने परवानगी नाकारली. त्यामुळे दसऱ्याला फक्‍त दोन दिवस शिल्लक असताना मेळाव्याचे ठिकाण बदल्याचा निर्णय झाला. भगवानबाबांचे जन्मस्थान असणाऱ्या सावरगाव घाटात हा मेळावा होणार आहे. 

दोन दिवसांत या मेळाव्याला गर्दी जमविण्याचे मोठे आव्हान पंकजा समर्थकांपुढे असणार आहे. कार्यकर्ते त्यांच्या क्षमतेप्रमाणे काम करत आहेत. पंकजांच्या भगिणी खासदार प्रीतम मुंडे यांनीही जास्तीत जास्त गर्दी जमविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्या यंदाही रथयात्रा काढणार आहेत. दि. 30 रोजी सकाळी 7.30 वाजता गोपीनाथगड-परळी येथे त्यांच्या रथयात्रेला प्रारंभ होईल. सिरसाळा, तेलगाव, वडवणी, बीड, वंजारवाडी, पिट्टी नायगाव, तांबा राजुरी वांजरा फाटा, कुसळंबमार्गे 11.30 वाजता ही यात्रा सावरघाटात पोहचेल. रस्त्यात ठिकठिकाणी लोक आपल्या वाहनांसह या रथयात्रेत सहभागी होणार आहेत. 

संबंधित लेख