preetam munde letter to supporters | Sarkarnama

प्रीतम मुंडेंचा समर्थकांना संदेश; 'मी सुखरुप आहे'!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 29 सप्टेंबर 2018

त्यानंतर अनेकांचे फोन प्रीतम यांना जावू लागले.

पुणे: बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी अपघाताच्या बातम्यांचे खंडण केले आहे. मी सुखरुप असल्याचे पत्र त्यांनी सोशल मिडीयावर व्हायरल केले आहे.

शनिवारी दुपारी प्रीतम मुंडे या अपघातातून बचावल्याच्या चर्चा सोशल मिडीयावर सुरु झाल्या. त्यानंतर अनेकांचे फोन प्रीतम यांना जावू लागले. त्यामुळे हस्ताक्षरात पत्र लिहून त्यांनी खुलासा केला आहे. काल त्यांनी मुंबई- औरंगाबाद असा प्रवास केला. त्यावेळी खराब हवामानामुळे काहीवेळ विमानाला हादरे बसले, एवढा प्रसंग घडला. बाकी अपघात, इजा झालेली नाही. प्रत्येक फोन, मसेजला उत्तर देवू शकत नाही, म्हणून हे पत्र व्हायरल केल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

संबंधित लेख