Preetam Munde gave Vaccine to Children | Sarkarnama

तांड्यावर पारंपारिक पेहराव घालून स्वागत अन् डॉक्टर असलेल्या डाॅ. प्रितम मुंडेंनी स्वतः केले लसीकरण 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

आरोग्य विभागाकडून सुरु असलेल्या रुबेला आणि गोवर प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत गुरुवारी खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी सहभाग घेत स्वत:च्या हाताने बालकांना लस टोचली. विशेष म्हणजे, तांड्यावरील महिलांनी त्यांच्या डोक्यावर पारंपारिक पेहराव चढवून त्यांचे स्वागत केले. 

बीड : आरोग्य विभागाकडून सुरु असलेल्या रुबेला आणि गोवर प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत गुरुवारी खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी सहभाग घेत स्वत:च्या हाताने बालकांना लस टोचली. विशेष म्हणजे, तांड्यावरील महिलांनी त्यांच्या डोक्यावर पारंपारिक पेहराव चढवून त्यांचे स्वागत केले. 

वैद्यकीय पदवी (एमबीबीएस) आणि सौंदर्यशास्त्रातील पदव्युत्तर पदवी (एमडी. डरमॅटोलॉजीस्ट) असलेल्या डॉ. प्रितम मुंडे आरोग्य विभागाच्या कुठल्याही मोहिमेत खासदारापेक्षा डॉक्टराच्या भूमिकेत जातात. रुग्णांच्या ऱ्हदयाला स्टेथस्कोप लावून स्वत: तपासणी करुन उपचारही करतात. सध्या जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून बालकांसाठी मिसेल्स रुबेला आणि गोवर लसीकरण सुरु आहे. गुरुवारी डॉ. प्रितम मुंडे मोहिमेच्या जनजागृतीसाठी मोहिमेत सहभागी झाल्या. मांडेखेल (ता. परळी) येथील शाळेत जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांना स्वत: लस टोचली. तत्पुर्वी तांड्यावरील महिलांनी त्यांचे पारंपारिक पेहराव घालून स्वागत केले. त्यांच्या समवेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, डॉ. लटपटे, सुधाकर पोळ, तानाजी व्हावळे, सतोश सोळके, भिमराव मुंडे, गौतम मुंडे, उत्तम मुंडे, गंगाराम नागरगोजे होते.

संबंधित लेख