बीडमध्ये पुन्हा दबंग कि जय बजरंग?

भाजप आणि राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केलेल्या निवडणुकीत भाजपला मोठी ताकद लावावी लागली. सर्व बाबी दुय्यम ठरत शेवटी ही निवडणुक जातीवर येऊन ठेपली होती.
बीडमध्ये पुन्हा दबंग कि जय बजरंग?

बीड : राज्यात राजकीयदृष्ट्या महत्वाची असलेल्या बीड लोकसभेचे मतदान गुरुवारी पार पडले. खासदार आणि भाजपच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यात सरळ लढत झाली. आता खासदार कोण याचीच चर्चा मतदार संघात सुरु झाली आहे. भाजपवाले पुन्हा दबंग तर राष्ट्रवादीकडून जयबजरंग असे नारे सुरु झाले आहेत. 

भाजपने पुन्हा खासदार डॉ. प्रितम मुंडे यांना संधी दिली. तर, राष्ट्रवादीने जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांना रिंगणात उतरविले. भाजपने दबंग खासदार असे नारे सुरु केल्यानंतर राष्ट्रवादीने जय बजरंग अशी आरोळी ठोकत निवडणुकीत रंग आणला. शेतकरीपुत्र ही टॅगलाईन देत सामान्य घटक सोबत घेण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला. दरम्यान, राष्ट्रवादीकडून शरद पवार यांच्या दोन सभा आणि फौजिया खान व आमदार विद्या चव्हाण यांच्या सभा सोडल्या तर इतर कोणी मोठा नेता आणला नाही. भाजपने मात्र मुख्यमंत्र्यांपासून अनेक मंत्र्यांना जिल्ह्यात बोलविले.

शेवटच्या टप्प्यात तर छत्रपती संभाजी राजेंनाही आणावे लागले. एकूणच शेवटपर्यंत ही निवडणुक प्रतिष्ठेची आणि तेवढीच अटितटीची झाली. प्रचार काळात आपल्या नेत्यांच्या प्रचारासह समोरच्या उमेदवारांची प्रतिमा हजन करणाऱ्या पोस्टचाही समर्थकांचा धडाका होता. जातीचा मुद्दाही निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गाजला. पण, जातीवाद केला कोणी हे शेवटपर्यंत कळाले नसले तरी दोन्ही बाजूंच्या दृष्टीने फायद्याचा असल्याने या मुद्द्याला चांगलीच हवा देण्यात आली. गुरुवारी मतदानानंतर आता खासदार कोण, अशी चर्चा सुरु झाली. भाजपवाले पुन्हा दबंग तर राष्ट्रवादीवाले आता बजरंग अशा आरोळ्या ठोकू लागले आहेत. मात्र कोणाच्या माथी गुलाल लागणार हे पुढच्या महिन्यात २३ मेला कळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com