prc comitee in aurangabad zp | Sarkarnama

नगर ZP चा साडेचार कोटींचा 'योगदान अहवाल' PRC ला मिळाला कां?

​ मुरलीधर कराळे 
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

नगर : पंचायतराज समिती (पीआरसी) सध्या नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. आज दिवसभर विविध पंचायत समित्यांना या सदस्यांनी भेटी दिल्या. पण जिल्हाभर एकच चर्चा सुरू होती, योगदान अहवालाची. 

नगर : पंचायतराज समिती (पीआरसी) सध्या नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. आज दिवसभर विविध पंचायत समित्यांना या सदस्यांनी भेटी दिल्या. पण जिल्हाभर एकच चर्चा सुरू होती, योगदान अहवालाची. 

योगदान अहवाल म्हणजे काय, तर या सदस्यांसाठी झालेल्या खर्चाची तरतूद. हा खर्च थोडा नव्हे, तब्बल साडेचार कोटी जमवले गेल्याची शक्‍यता भारतीय जनसंसद या संघटनेचे राज्य निमंत्रक अशोक सब्बन यांनी व्यक्त केली. सरकारी अधिकारी, ग्रामसेवकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सब्बन यांना यापूर्वीच ही माहिती दिली होती. त्यासाठी सब्बन यांनी समिती येण्याच्या आधीच एका पत्रकाद्वारे पुरावे देण्याचे आवाहन केले होते.

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांकडूनही अशी रक्कम संकलित होत असल्याची तक्रार काहींनी संघटनेकडे केली होती. नियोजन बैठकीत कर्मचाऱ्यांना मोबाइल बंद करायला लावून या निधी संकलनासंबंधित माहिती देण्यात आली होती. आता अशाच सांकेतिक भाषेत सर्व संबंधितांना सोशल मीडियावरून मॅसेज पाठवून योगदान अहवाल सादर करा, असे सांगितले जात होते. याबाबत भारतीय जनसंसद थेट पंचायत राज मूल्यमापन समितालाच (पीआरसी) पत्र लिहून कळविले आहे, असे सब्बन यांनी सांगितले.

पंचायत राज समितीच्या सदस्यांना हप्ते देण्यासाठी अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून हप्ते वसुल होत असून, त्यासाठी सांकेतिक भाषेचा वापर केला जात आहे. ही एकप्रकारे दमदाटी आहे. याची चौकशी व्हावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत यांनी केली यांनी केली आहे. याबाबत राऊत यांनी एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. पंचायत राज समिती कशासाठी येते, कामांचा आढावा घेण्यासाठी की हप्ते वसुल करण्यासाठी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 

संबंधित लेख