हल्ला करणारा प्रवीण गोसावी होता आठवलेसाहेबांचाच कार्यकर्ता ! 

हल्ला करणारा प्रवीण गोसावी होता आठवलेसाहेबांचाच कार्यकर्ता ! 

अंबरनाथ : केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांना मारहाण करणाऱ्या प्रवीण गोसावी नामक व्यक्ती हा गेले अनेक दिवस फेसबुकवर उलट सुलट पोस्ट टाकत होता. 

गोसावी हा आठवले यांच्या विरोधात पोस्ट शेअर करत होता, मात्र त्यावेळी त्याच्या विरोधात कोणत्याही आर पी आय कार्यकर्त्यांनी किंवा नेत्याने त्याच्या विरोधात तक्रार केली नसल्याचे समोर आलं असून,त्याला आठवलेची कार्यपद्धतीवर तो नाराज होता,

तो काही दिवस आरपीआयच्या अंबरनाथच्या युवक आघाडीचा सचिव होता दरम्यान त्याचे काही वाद झाल्याने त्याला पदावरून काढण्यात आले होते अशी माहिती पुढे येत आहे. 

दरम्यान, आठवले यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी ठाण्यातील काही कार्यकर्त्यांनी मुलुंड चेकनाका येथे वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्याना बाजूला केल्यामुळे वाहतूक सुरळीत झाली आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच आठवले समर्थकांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com