pravin gaikwad, pune | Sarkarnama

"कर्जमाफीचे श्रेय विरोधकांना मिळू  नये यासाठी शेट्टी-कडूंना बोलावले'  

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 22 जून 2017

पुणे : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे श्रेय विरोधी पक्षांना मिळू नये म्हणून राज्य सरकारने खासदार राजू शेट्टी आणि आमदार बच्चू कडू यांना अखेरच्या टप्प्यात वाटाघाटीला बोलावून घेऊन तोडगा जाहीर केला.'' असे शेकापचे नेते प्रवीण गायकवाड यांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 

पुणे : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे श्रेय विरोधी पक्षांना मिळू नये म्हणून राज्य सरकारने खासदार राजू शेट्टी आणि आमदार बच्चू कडू यांना अखेरच्या टप्प्यात वाटाघाटीला बोलावून घेऊन तोडगा जाहीर केला.'' असे शेकापचे नेते प्रवीण गायकवाड यांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 

श्री.प्रवीण गायकवाड म्हणाले,"" विधानसभेत आणि विधान परिषदेत सर्व विरोधी पक्ष शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर आक्रमक झाले होते. आक्रमक विरोधकांना आवर घालण्यासाठी राज्य सरकारने आठ आमदारांना निलंबितही केले होते. त्यानंतर सुनील केदार आणि जितेंद्र आव्हाड यांनी संघर्ष यात्रेचा प्रस्ताव मांडला. चांदा ते बांदा निघालेलीही संघर्ष यात्रा माझ्या मते चांगलीच यशस्वी झाली. लोकांचा या संघर्षयात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे राज्यात कर्जमाफीवरून वातावरण किती तापले आहे. याचा अंदाज शासनाला आला.'' 

श्री. गायकवाड पुढे म्हणाले,"" सरकारने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला श्रेय मिळू नये यासाठी आधी पुणतांब्यातच्या युवक शेतकऱ्यांच्या समितीला चर्चेला बोलावून कर्जमाफीचा विषयी घाई घडबडीने गुंडाण्याचा प्रयत्न केला. पण, मध्यरात्रीची चर्चा सरकारच्या अंगलटीस येताच त्यांनी दुसरा पर्याय स्वीकारला. राज्य सरकारबरोबर गेल्या अडीच तीन वर्षापासून असलेल्या खासदार राजू शेट्टी आणि आमदार बच्चू कडू यांना सरकारने महत्त्व देणे पसंद केले. राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांच्या गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या आंदोलनालाही सरकारनेच रसद पुरवली असावी.'' 

श्री. गायकवाड म्हणाले,"" शेतकरी कामगार पक्षाने देशात सर्वात प्रथम शेतकऱ्यांचा संप घडवून आणलेला होता. त्यानंतर अलिकडे वायएसआर रेड्डी मुख्यमंत्री असतांना आंध्र प्रदेशमध्ये तांदुळाला भाव न मिळाल्याने तीन जिल्ह्यात शेतकऱ्यांनी तांदूळ उत्पादन घ्यायचे नाही असे आंदोलन केले होते. आता झालेल्या शेतकरी संपाच्या प्रारंभीच्या बैठकांना मी हजर होतो.पण, संपाचे स्वरूप पाहून नंतर मी त्यापासून दूर झालो.'' 

संबंधित लेख