praveen gaikwad about modis caste | Sarkarnama

#MarathaReservation मोदींनी स्वत:ची व्यापारी जात ओबीसीत आणली : गायकवाड 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना, प्रधानमंत्री होण्यासाठी 52 टक्के जातींचा लोकप्रतिनिधी असणे आवश्‍यक असल्यानेच त्यांनी मोदगोची ही (तेली) व्यापारी असणारी व प्रगत असणारी जात ओबीसींमध्ये कोणताही गाजावाजा न करता घातली.

-प्रवीण गायकवाड

सांगली : "नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना, प्रधानमंत्री होण्यासाठी 52 टक्के जातींचा लोकप्रतिनिधी असणे आवश्‍यक असल्यानेच त्यांनी मोदगोची ही (तेली) व्यापारी असणारी व प्रगत असणारी जात ओबीसींमध्ये कोणताही गाजावाजा न करता घातली. मात्र ज्या शाहू महराजांनी मागासांना आरक्षण देण्याची संकल्पना मांडली, त्यांचीच जात मागास होत असताना, त्यांना मात्र आरक्षण नाकारले जाते', अशा शब्दांत संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी भूमिका मांडली. 

सांगली येथे आले होते. ते म्हणाले,""मराठा समाजाचे सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू आहे. राज्यभर आंदोलनातील दहा हजार तरुणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. ते सरकारने तत्काळ मागे घ्यावेत. आरक्षणाच्या मागणीसाठीचे हे आंदोलन राहिले नसून जनचळवळ झाली आहे. समाजाने 9 ऑगस्ट आणि यापुढील सर्वच आंदोलने शांततेने करावीत. क्रांतिदिनाचे आंदोलन जिल्हाधिकारी, तहसील अथवा मोकळ्या मैदानात एकत्र येऊन शांततेने सुरू ठेवावे. आत्महत्या करू नयेत. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर सरकार कोम्बिंग ऑपरेशन करत आहे? त्यामुळे आणखी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 

संबंधित लेख