prataprao jadhav mp shivsena | Sarkarnama

खासदार प्रतापराव जाधवांनी मोर्चातून साधली शक्तीप्रदर्शनाची संधी

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

बुलडाणा : दुष्काळाच्या मुद्द्यावर खासदार प्रतापराव जाधवांनी शिवसेनेचा जंगी मोर्चा काढून एकाच दगडात आंदोलन आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शक्तीप्रदर्शन असे दोन पक्षी मारले आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात खासदार प्रतापराव जाधव धूर्त राजकारणी. संकटालाही संधीत कसे बदलायचे हे त्यांना चांगले ठावूक आहे. सध्या जिल्ह्यात व महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचा विषय सगळीकडे गाजतो आहे. 

सत्तेत मांडीला मांडी लावून बसणारी शिवसेना रस्त्यावर आली की लगेच सरकार विरोधात वातावरण तापायला सुरवात होते. बुलडाणा जिल्ह्यातही तेच झाले. दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुलडाण्यात येऊन गेले. आवश्‍यकता नसताना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे सुद्धा दौरा करून गेले. पण जे ठरलेले होते तेच झाले. केवळ 8 तालुक्‍यात दुष्काळ जाहीर झाला. 

जिल्ह्यातील वगळलेल्या 5 तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, अधिकारी वर्गाने शाबासकी मिळविण्यासाठी खोटी माहिती पुरवून दिशाभूल करणे थांबवावे, अशा शिवसेनेच्या मागण्या आहेत. शिवसेनेच्या या मोर्चाला गर्दीही चांगली जमवण्यात आली. मेहकर आणि लोणारकरांनी मोठा सहभाग नोंदविला व एकंदरीत शिवसेनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी चांगली मेहनत घेऊन मोर्चाची मोहीम फत्ते केली. त्यामुळे आता पुढची जबाबदारी सरकारची आहे. पण मोर्चामुळे शक्तीप्रदर्शनाचेही कामात काम होऊन गेल्याने खासदार जाधव यांनी पक्षातंर्गत व बाहेरील विरोधकांना चांगलाच शह दिला आहे. 

संबंधित लेख