pratap patil chikhalikar and chavan | Sarkarnama

अशोक चव्हाण विधानसभा निवडणूक लढवतील - प्रताप पाटील चिखलीकर

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

नांदेड : आगामी निवडणुकांमध्ये खासदार अशोक चव्हाण हे विधानसभेच्या मैदानात असतील असा अंदाज आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर पक्षाने आदेश दिल्यास मी नांदेड लोकसभा निवडणूक लढवेन असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात भाजपचे पुढील निवडणुकीनंतर 9 आमदार असतील असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. 

गेल्या विधानसभा निवडणुकीत नांदेड दक्षिण मतदारसंघातून अवघ्या तीन हजार मतांनी पराभूत झालेले भाजप व्यापारी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात चिखलीकर बोलत होते. यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खतगांवकर, आमदार राम पाटील रातोळीकर, भाजपा शहर महानगरचे अध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे आदी मान्यवर उपस्थिती होते. भोकर हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला ढासळत असल्यामुळे अशोक चव्हाण विधानसभेची निवडणूक नांदेड दक्षिणमधून लढवण्याची तयारी करत आहेत असेही चिखलीकर यांनी सांगितले. भारतीय जनता पार्टीकडे माजी खासदार भास्करराव पाटील खतगांवकर यांचे वडिलधारे नेतृत्व असून नवनिर्वाचित आमदार राम पाटील रातोळीकर यांच्यावर मोठी जबाबादारी आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख