pratap jadhav mp | Sarkarnama

संजय जाधव यांच्या आंदोलनापुढे " प्रकाशगड' नमले

गणेश पांडे
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

परभणी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे रोहित्र व इतर मागण्यासाठी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (7) प्रकाशगड, मुंबई येथे करण्यात आलेल्या आंदोलनास यश आले. व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी आंदोलनाची दखल घेत जिल्हयाला तातडीने 50 रोहित्र बसविण्याचे आदेश दिले आहेत. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रोहित्राची प्रतिक्षा यादी दिवसेदिवस वाढत जात आहे. आज घडीला इथे 250 प्रतिक्षा यादी आहे. यादी कमी करण्यास येथील अधिकारी गांभीर्याने काम करतांना दिसत नाहीत. तसेच जिल्ह्यात वीजपुरवठ्याची देखील अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. या प्रश्नावर खासदार संजय 

जाधव यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी महावितरणच्या मुंबई येथील प्रकाशगड कार्यालयास हजारो शेतकरी व शिवसैनिकांच्या उपस्थितीत घेराव घातला. 

महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार व श्री. साबू यांच्या समोर जिल्ह्यातील महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या निष्क्रयतेचे पुरावे सादर केले. या मुळे परभणी जिल्ह्यातील महावितरणच्या अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा समोर आला. आंदोलनाची दखल घेत व्यवस्थापकीय संचालकांनी परभणी जिल्ह्यातील 250 रोहित्राच्या प्रतिक्षा यादीतील 50 रोहित्र तात्काळ देण्याचे आदेश संबंधीत अधिकाऱ्यांना दिले. तसेच रोहित्र दुरुस्त करणाऱ्या चार कंपन्या बंद अवस्थेत आहेत, त्या 15 दिवसात सुरु करण्याचे देखील आदेश दिले आहेत. 

जिल्ह्यात ज्या ठिकाणी 33 केव्ही उपकेंद्र कार्यान्वीत आहेत त्या जागेवर सोलार प्लॅट तातडीने बसविण्याचे देखील आदेश दिले आहेत. परभणी जिल्ह्यात महावितरण अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभारावर व्यवस्थापकीय संचालक प्रचंड नाराज झाले. त्यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना धारेवर धरत शेतकऱ्यांच्या प्रश्नाना प्राधान्य देऊन तातडीने कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. या आंदोलनात खासदार संजय जाधव यांच्यासह शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले, जिल्हा सहसंपर्क प्रमुख सुधाकर खराटे, जिल्हा प्रमुख विशाल कदम, सुरेश ढगे, अर्जून सामाले, प्रभाकर वाघीकर, विष्णू मांडे, पंढरीनाथ घुले, दीपक बारहाते, विष्णू पुरनाळे, रवि पतंगे आदीसह अनेक शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते. 

संबंधित लेख