prashant paricharak shivsena | Sarkarnama

परिचारकांच्या मुद्द्यावर शिवसेना आक्रमक 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 6 मार्च 2018

मुंबई : विधान परिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक यांचे निलबंन रद्द करण्याच्या मुद्द्यावर शिवसेना आज दुसऱ्या दिवशी आक्रमक आहे. कामकाजाला सुरवात होताच 
शिवसेना सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. त्यामुळे विधानसभेचे कामकाज 15 मिनीटांसाठी तहकूब करण्यात आले. त्यानंतर कामकाज रेटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत शिवसेना सदस्यांनी सभात्याग केला. 

विधानसभेच्या आजच्या सातव्या दिवसाच्या कामकाजाला सुरवात होताच शिवसेना सदस्यांनी आक्रमक होत प्रशांत परिचारकांच्या निलबंनाचा मुद्द्यावर घोषणा द्याला सुरवात केली. तर भाजपच्या सदस्यांनी विधान परिषदचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निलबंनाची मागणी करत गोंधळ घालण्यास सुरवात केला. त्यावेळी याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल असं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्याचे स्वागत विरोधीपक्षांनीही केले. मात्र, परिचारकांच्या निलबंन रद्दच्या मुद्दयावर शिवसेनेचे पक्षप्रतोद सुनील प्रभू यांनी विधानसभा कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. 

त्यावर मुख्यमंत्री जे काही आवश्‍यक असले ते केले जाईल असेल असे सांगितले. त्यावर असहमती दर्शवत सुनील प्रभू म्हणाले, "" आम्ही वारंवारं प्रशांत परिचारकांच्या बडतर्फीची मागणी करत आहोत. मात्र, सरकार कामकाज रेटून नेत आहेत. त्यामुळे आम्ही निषेध करत सभात्याग करत आहोत.'' 

संबंधित लेख