आमदार परिचारकांचे निलंबन रद्द करण्यावरून शिवसेना आक्रमक

विधानसभेत आज कामकाजाला सुरवात होताच शिवसेनेच्या आमदार आक्रमक झाले होते. विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या निलंबन रद्द करण्याच्या मुद्द्यावर शिवसेना सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. त्यामुळे विधानसभेचे कामकाज 15 मिनीटांसाठी तहकूब करण्यात आले. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू होताच शिवसेनेच्या सदस्यांनी गोंधळ केल्याने कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आले.
आमदार परिचारकांचे निलंबन रद्द करण्यावरून शिवसेना आक्रमक

मुंबई : विधानसभेत आज कामकाजाला सुरवात होताच शिवसेनेच्या आमदार आक्रमक झाले होते. विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या निलंबन रद्द करण्याच्या मुद्द्यावर शिवसेना सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. त्यामुळे विधानसभेचे कामकाज 15 मिनीटांसाठी तहकूब करण्यात आले. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू होताच शिवसेनेच्या सदस्यांनी गोंधळ केल्याने कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आले.

प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाच्या मागणीवर शिवसेना सदस्यांनी आक्रमक होत विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली होती. त्यामुळे आजचे कामकाज वादळी होणाची चिन्हे दिसत होती. विधानसभेत आजच्या सहाव्या दिवशी कामकाजाला सुरवात होताच शिवसेनेच्या सदस्यांनी वेलमध्ये उतरत घोषणा देण्यास सुरवात केली. यावळी प्रशांत परिचारक यांच्या निषेधाचा फलक शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेत फडकावला. सत्ताधारीच वेलमध्ये उतरल्याने अध्यक्षांनी कामकाज पंधरा मिनीटांसाठी कामकाज तहकुब केले.

पुन्हा कामकाज सुरू होताच शिवसेना सदस्यांनी परिचारकांचे निलंबन करा, जय जवान जय किसान, भाजप सरकार हाय हाय अशा घोषणा दिल्या. 

यावेळी शिवसेना सदस्यांच्या मागणीला पाठिंबा देत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, "आमदार परिचारांचा निलबंन रद्द करण्याचा विषय महत्वाचा आहे. परिचारकांनी सैनिकांचा अवमान करत देशद्रोहाचा गुन्हा केला आहे. त्यामुळे आमची मागणी आहे, की परिचारकांना कायमस्वरूपी निलंबित करावे. परिचारकांनी सैनिकांचा अवमान केला असल्याने अनेक माजी सैनिकांनी आमच्याकडे तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्यावर निलबंनाची कारवाई मागे घेणं हे सभागृहाचा अवमान आहे. त्यामुळे त्यांना प्रशांत परिचारकांचे कायम स्वरूपी निलंबन करावे.

यावेळी सदस्यांचा गोंधळ सुरूच होता. त्यावेळी निवेदन करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, "प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाबाबत एकमताने वरच्या सभागृहात ठराव मंजूर झाला आहे. त्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली होती. त्या समितीत धनंजय मुंडे, नीलम गोऱ्हे आणि त्यावेळी कॉग्रेसकडून नारायण राणे होते. त्यासमितीने निलंबन रद्द करण्याचा एकमताने ठरावं घेण्यात आला आहे. या समितीच्या शिफारस वरून निलबंन रद्द करण्याचा ठराव मांडण्यात आला होता. समितीने जो निर्णय जो दिला, त्यात राष्ट्रवादीचो धनंजय मुंडे आहेत. त्यावेळी काँग्रेसचे सदस्य असलेले राणे ही आहेत तर शिवसेनेच्या निलमताईही आहेत, हे लक्षात घ्या!"
 
मात्र प्रशांत परिचारकाच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून गोंधळ वाढल्याने विधानसभेचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com