भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांचे साम्राज्य  दोनशे कोटींचे  !

BJP Prasad Lad
BJP Prasad Lad

मुंबई : विधानपरिषदेच्या पोटनिवडणूकीसाठी भाजपकडून मैदानात उतरलेल्या प्रसाद लाड यांची एकूण संपत्ती 210 कोटी 62 लाख असल्याचे त्यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट झाले आहे.

प्रसाद लाड यांच्याकडे 47 कोटी 71 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांच्या एकूण जंगम मालमत्ता पैकी 39 कोटी 26 लाख रुपये शेअर्स आणि बाँडच्या स्वरूपात गुंतवणूक केलेली आहे. लाड यांची पत्नी नीता यांच्याकडे 48 कोटी 95 लाख, मुलगी सायली कडे एक कोटी 15 लाख, आणि मुलगा शुभम याच्याकडे 28 लाख 28 हजार रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

प्रसाद लाड यांच्याकडे 55 कोटी 86 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यामध्ये पाथर्डी तालुक्यातील शेतजमीन, मुंबईतील सायन येथील एक प्लॉट, पुण्यातील एरंडवणे येथील एक कार्यालय, दादर येथील एक व्यवसायिक इमारत, दादरच्या प्रसिद्ध कोहिनुर मिल इमारत मधील सदनिका आणि माटुंगा येथील एक निवासी इमारत यांचा समावेश आहे.

प्रसाद लाड यांच्या पत्नी निता यांच्याकडे 54 कोटी 94 लाखाची स्थावर संपत्ती आहे. त्यामध्ये खालापूर येथील शेत जमीन, माटुंगा येथील व्यवसायिक इमारत, चेंबूर येथील निवसी इमारत या स्थावर मालमत्ताचा समावेश आहे.

याव्यतिरिक्त लाड कुटुंबीयांकडे सामूहिक अशी 10 कोटी 45 लाख रुपयांची स्थावर मालमत्ताही आहे.  त्याचबरोबर प्रसाद लाड यांच्यावर 41 कोटी 48 लाखांचे कर्ज आहे. पत्नी नीता यांच्या नावे 42 कोटी 21 लाखाचे कर्ज आहे. मुलगी सायली हिच्या नावे 1 कोटी 7 लाख तर मुलगा शुभम याच्या नावे 18 लाख 49 हजार रुपयांचे कर्ज आहे.

प्रसाद लाड यांनी नमूद केल्यानुसार ते वर्षाला चार कोटी 22 लाख इन्कम टॅक्स भरतात. तर त्यांची पत्नी 1 कोटी 84 लाख इन्कम टॅक्स भरत असल्याचे त्यानी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com