prakasha bharsakale | Sarkarnama

आजचा वाढदिवस : प्रकाश भारसाकळे, आमदार, भाजप  अकोट विधानसभा मतदार संघ, जि. अकोला

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

 

 

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्‍यातून शिवसेनेच्या माध्यमातून प्रकाश भारसाकळे यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरवात झाली. सहकार क्षेत्रात आपला दबदबा कायम करीत त्यांनी दर्यापूर मतदार संघातून दोनदा आमदारकी भूषविली. विकास कामांचा धडाका आणि प्रशासनावरील मजबूत पकड या दोन बाबींमुळे जनमानसात आमदार भारसाकळे यांची धडाकेबाज आमदार म्हणून प्रतिमा आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर राणेंसह आमदार भारसाकळे यांनीही शिवसेनेला "जय महाराष्ट्र' करीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला. मात्र, कॉंग्रेसमध्ये त्यांचे मन फार जास्त दिवस रमले नाही. दर्यापूर मतदार संघ राखीव झाल्यावर त्यांनी अकोट विधानसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढविली. मात्र, त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांना अमरावती जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले.

संबंधित लेख