prakasha ambedkar and maratha kranti morcha | Sarkarnama

"आरएसएस', भाजपने मराठा आरक्षणावर आपला मसुदा जाहीर करावा : प्रकाश आंबेडकर

सरकारनामा ब्युरो
रविवार, 29 जुलै 2018

नाशिक : राज्य शासनाने विरोधी पक्षांच्या बैठका, विशेष अधिवेशन घेऊन काय साध्य होईल असे वाटत नाही. कारण बैठकांनतर "पॉप्युलर' घोषणांच्या पलिकडे काहीच होतांना दिसत नाही. त्यामुळे आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने आपला मसुदा जाहीर करावा असे भारीप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

नाशिक : राज्य शासनाने विरोधी पक्षांच्या बैठका, विशेष अधिवेशन घेऊन काय साध्य होईल असे वाटत नाही. कारण बैठकांनतर "पॉप्युलर' घोषणांच्या पलिकडे काहीच होतांना दिसत नाही. त्यामुळे आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने आपला मसुदा जाहीर करावा असे भारीप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

ते म्हणाले, मराठा आरक्षणाविषयी सध्या प्रश्‍न सुटावा अशी स्पष्ट भूमिका कोणीच मांडत नाही. विशेषतः शरद पवार यांनी आरक्षणासाठी घटनेत दुरुस्ती करावी लागेल असे सांगितले आहे. यापूर्वी त्यांनी आर्थिक निकषावर आरक्षणाची भूमिका मांडली होती. त्यामुळे त्यांनी आधी घटना दुरुस्तीचा मसुदा सादर करावा. त्यामुळे अधिक स्पष्टता येईल. राज्य सरकार गंभीर चर्चा व कार्यवाही याऐवजी पॉप्युलर घोषणा व गुंतागुंत वाढविण्यातच व्यस्त आहे. आधी सत्ताधारी भाजप व सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. त्यांनी धनगर समाजाला अनुसुचित जाती- जमातीचे आरक्षण देता येत नाही असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. त्यामुळे धनगर समाजाने आपली भूमिका व दिशा स्पष्ट करुन सत्ताधारी पक्षाबरोबर राहण्याऐवजी स्वतंत्र वाट चोखाळली. तसेच मराठा समाजालाही करता येईल. 

ते पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशन आणि गोलमेज परिषदेत सामाजिक मागासलेपणावर आधारीत आरक्षण देण्याची भूमिका मांडली होती. त्या आधारेच मराठा समाजाला आरक्षण देणे शक्‍य आहे. आजही राज्य घटनेनुसार आर्थिक निकषांच्या नव्हे तर सामाजिक मागासलेपणाच्या आधारेच आरक्षण शक्‍य आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाकडे सत्ता असली तरी राज्यातील 159 कुटुंब वगळता उर्वरीत समाज मागासलेलाच आहे असे आम्ही मानतो. मात्र मराठा समाज अद्यापही आपल्या नेत्यांच्या आदेशावर विश्‍वास ठेवतो. समाज त्यातून बाहेर पडला तरच नॉन मराठा नेते आपली भूमिका मांडू शकतील. अन्यथा त्यांच्या भूमिकेवर रिऍक्‍शन येण्याचा धोका आहे. यावेळी माजी आमदार हरिभाऊ भदे (अकोला), विजय मोरे (बारामती), जिल्हा अध्यक्ष पवन पवार आदी नेते उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख