prakash mulake winning celebration | Sarkarnama

#SangliResult तो आलेला दिवंगत वडिलांचा ड्रेस घालून...गुलालाने न्हावून निघण्यासाठी! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

सांगली : महापालिकेच्या निवडणूकीत जय-पराजयाच्या पलिकडे काही भावनांचे बंध जोडलेले असतात. या कथा पक्ष, संघटना, तुझा-माझा यापलिकडे असतात. अशीच एक गोष्ट आज सांगलीत प्रभाग दहामधील कॉंग्रेसचे उमेदवार प्रकाश मुळके यांच्याबाबत घडली. 

सांगली : महापालिकेच्या निवडणूकीत जय-पराजयाच्या पलिकडे काही भावनांचे बंध जोडलेले असतात. या कथा पक्ष, संघटना, तुझा-माझा यापलिकडे असतात. अशीच एक गोष्ट आज सांगलीत प्रभाग दहामधील कॉंग्रेसचे उमेदवार प्रकाश मुळके यांच्याबाबत घडली. 

सन 2013 च्या निवडणुकीत प्रकाश यांचे वडील शामराव मुळके कॉंग्रेसकडून लढत होते. निवडणूक रंगात असतानाच प्रचार सभेत ते कोसळले आणि हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने त्यांचे निधन झाले. निवडणूक सात दिवस पुढे ढकलली. कॉंग्रेसने प्रकाश यांना उमेदवार दिली. त्यावेळी प्रकाश यांनी वडिलांच्या अंगावरील शर्ट आणि पॅंट काढून ठेवली होती. आयुष्यात जेंव्हा कधी निवडणूक जिंकेन तेंव्हा वडिलांचा हा शेवटचा ड्रेसच घातलेला असेल, असे मनाशी ठरवले होते. दुर्दैवाने त्यांना त्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. गेली पाच वर्षे त्यांनी जोमाने काम केले. 

या निवडणुकीत पुन्हा उमेदवारी मिळवली आणि ते जिंकलेसुद्धा. विशेष म्हणजे, आज सकाळी मतमोजणी केंद्रावर जाताना त्यांनी वडिलांचा तो ड्रेस घातला होता. विजयाचा गुलाल त्याच ड्रेसवर झेलताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. त्या ड्रेसवरच जाऊन प्रकाश यांनी दिवंगत नेते मदनभाऊंच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. सोबत शीतल लोंढे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख